CoronaVirus Updates: राज्यात दिवसभरात ५ हजार १३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 08:08 PM2021-08-18T20:08:07+5:302021-08-18T20:08:23+5:30
राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.९३ टक्के एवढे झाले आहे.
मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार १३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १५८ जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. तसेच आज एकूण ८ हजार १९६ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ०९ हजार ३६४ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.९३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी १४ लाख ८९ हजार ०८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ०६ हजार ३४५ (१२.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ४६ हजार २९० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra records 5,132 fresh #COVID19 cases, 8,196 recoveries and 158 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 18, 2021
Active cases: 58,069
Total cases: 64,06,345
Death Toll: 1,35,413 pic.twitter.com/cJbpgDIRfh
दरम्यान, राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, मात्र तरी देखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. असे जरी असले तरी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत असल्याने, काहीसा दिलासा वाटत आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.