CoronaVirus Updates: राज्यात दिवसभरात ६ हजार ६८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 11:36 PM2021-08-13T23:36:58+5:302021-08-13T23:37:43+5:30

राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

CoronaVirus Updates: 6 thousand 686 new corona infections registered in the maharashtra; 158 people died in 24 hours | CoronaVirus Updates: राज्यात दिवसभरात ६ हजार ६८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५८ जणांचा मृत्यू

CoronaVirus Updates: राज्यात दिवसभरात ६ हजार ६८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५८ जणांचा मृत्यू

Next

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ६८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १५८ जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. तसेच आज एकूण ५ हजार ८६१  जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८५ टक्के एवढे झाले आहे.  सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे. 

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ०५ लाख ४५ हजार ५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ८२ हजार ०७६ (१२.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ७० हजार ८९० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार ००४ इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार ५२२ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ६ हजार ६६९ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ०६८ इतकी आहे. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ५२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ३५९ सक्रिय रुग्ण आहेत. तर सोलापुरात ४ हजार ८१० इतके रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत ४ कोटी ७९ लाख ३८ हजार २५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी १ लाख८३ हजार ५०६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४१ हजार १९५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ३ कोटी २० लाख ७७ हजार ७०६ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर ४९० जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख २९ हजार ६६९ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

Web Title: CoronaVirus Updates: 6 thousand 686 new corona infections registered in the maharashtra; 158 people died in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.