मुंबई : मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ८० हजार ११५ झाली असून बळींचा आकडा ११ हजार ६२० झाला आहे. सध्या शहर उपनगरात ३३ हजार ९६१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८८ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७५ दिवसांवर आला आहे. १८ ते २४ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.८९ टक्के असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत दिवसभरात ४६ हजार ८६९ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ३८ लाख ४१ हजार ३६९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्स ४० असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ४५७ आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २६ हजार ६८२ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.