Coronavirus: बापरे! मुंबईतील 'या' ७ भागात कोरोनाचा कहर; रुग्णवाढीमुळे महापालिका अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 10:17 PM2021-03-03T22:17:50+5:302021-03-03T22:18:13+5:30
Coronavirus Updates in Mumbai: सात विभागांमध्ये रुग्ण वाढीचा दर अधिक
मुंबई - कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबईतील रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.२९ पर्यंत वाढला आहे. तर वांद्रे प., चेंबूर, मुलुंड, अंधेरी प.,सायन, गोवंडी, घाटकोपर या विभागात त्याहून अधिक रुग्ण वाढ दिसून येत आहे. दररोज या विभागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना सुरू आहेत.
जानेवारी महिन्यात दररोज बाधित रुग्णांचा आकडा तीनशेपर्यंत खाली आला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून लोकलमधून सर्वसामान्य लोकांनाही प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यांनी बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दररोज एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दरही वाढला आहे.
ही वाढ सुरुवातीला चेंबूर आणि मुलुंडमध्ये अधिक दिसून येत होती. त्यामुळे महापालिकेने कडक उपाय योजना आखून काही निर्बंध आणली. यामध्ये सरकारी व खाजगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती आणि लग्न समारंभ, व्यायामशाळा, हॉटेल, पब या ठिकाणी ५० लोकांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर फौजदारी कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे.
या विभागात सर्वाधिक वाढ
विभाग....दैनंदिन रुग्ण वाढ
एच पश्चिम, वांद्रे प....०.४३
एम पश्चिम, चेंबूर...०.४२
टी, मुलुंड.... ०.४०
के पश्चिम, अंधेरी प.... ०.३८
एफ उत्तर, सायन, माटुंगा... ०.३४
एम पूर्व..गोवंडी, मानखुर्द... ०.३३
एन, घाटकोपर.... ०.३१