coronavirus: पोस्टाच्या नेटवर्कचा आयसीएमआरकडून वापर, पोस्ट खात्यामार्फत रोज एक लाख कोरोना टेस्टिंग किट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 07:00 AM2020-05-10T07:00:11+5:302020-05-10T07:00:42+5:30

आयसीएमआरने कोरोना चाचणीसाठी २०० नव्या लॅबना परवानगी दिली आहे. देशभरात विस्तारलेल्या पोस्टाच्या १६ विभागांमध्ये एक लाख ५६ हजार कार्यालये आहेत. त्यांच्यामार्फत दररोज एक लाख टेस्टिंंग किट ड्राय आइसच्या खोक्यांमध्ये सुरक्षित पद्धतीने भरून मान्यताप्राप्त लॅबपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे.

coronavirus: Use of Post's network by ICMR, one lakh corona testing kits daily through Post | coronavirus: पोस्टाच्या नेटवर्कचा आयसीएमआरकडून वापर, पोस्ट खात्यामार्फत रोज एक लाख कोरोना टेस्टिंग किट

coronavirus: पोस्टाच्या नेटवर्कचा आयसीएमआरकडून वापर, पोस्ट खात्यामार्फत रोज एक लाख कोरोना टेस्टिंग किट

Next

 मुंबई : कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने दररोज किमान एक लाख लोकांच्या तपासण्या करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यासाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चकडून (आयसीएमआर) उपलब्ध होणारे टेस्टिंंग किट देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भारतीय पोस्ट खात्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे.
आयसीएमआरने कोरोना चाचणीसाठी २०० नव्या लॅबना परवानगी दिली आहे. देशभरात विस्तारलेल्या पोस्टाच्या १६ विभागांमध्ये एक लाख ५६ हजार कार्यालये आहेत. त्यांच्यामार्फत दररोज एक लाख टेस्टिंंग किट ड्राय आइसच्या खोक्यांमध्ये सुरक्षित पद्धतीने भरून मान्यताप्राप्त लॅबपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. हे काम प्रभावी पद्धतीने करण्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावरील कार्यालयामध्ये नोडल आॅफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच हे किट विनाविलंब लॅबपर्यंत पोहोचविण्यासाठी वाहतूक व्यवस्थेसह प्रत्येक सर्कल स्तरावरही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

औषधांसह धान्याचाही पुरवठा
पोस्टाच्या माध्यमातून पत्र, मनिआॅर्डर, औषधांचा पुरवठा कायम होतो. लॉकडाउनच्या काळात ते गरजूंपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा करण्यातही मोलाची भूमिका बजावत आहेत. त्याशिवाय इम्फाल, डुंगरपूर, चुरू, झालावाड, कोलकाता, भुवनेश्वर, रांची, जोधपूर, उदयपूर, कोटा या भागांतील दुर्गम ठिकाणांवर पोस्टाने टेस्टिंंग किट पोहोचवली आहेत. शिवमोगा, तिरुनेलवेली, धर्मपुरी, तिरुपती, दार्जिलिंंग, गंगटोक, लेह, जम्मू, उधमपूर, झालावाड, भावनगर, दरभंगा, हृषीकेश आदी दुर्गम भागापर्यंतही विनासायास पोस्ट आपली सेवा देत असून ते जाळे टेस्टिंंग किट पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कामाचे कौतुक
आयसीएमआर आणि पोस्टाच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या कामाचे कौतुक केंद्रीयमंत्री रवि शंकर प्रसाद यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे, तसेच या आव्हानात्मक परिस्थितीत पोस्टमन खांद्याला खांदा लावत जे काम करत आहे ते उल्लेखनीय आहे, असेही त्यांनी नमूद
केले आहे.

Web Title: coronavirus: Use of Post's network by ICMR, one lakh corona testing kits daily through Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.