कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर करणे ठरू शकते अपायकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 08:21 PM2020-04-19T20:21:43+5:302020-04-19T20:33:15+5:30

निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

coronavirus: use of sanitation dome or tunnel to prevent corona infection is likely to dengerous | कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर करणे ठरू शकते अपायकारक

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर करणे ठरू शकते अपायकारक

Next
ठळक मुद्देराज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत आहेव्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारकसॅनिटेशन डोम अथवा टनेलचा वापर न करण्याच्या सूचना

मुंबई -  कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून  फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये अशी सूचना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.

 त्यानुसार आज सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समुहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना आटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

Web Title: coronavirus: use of sanitation dome or tunnel to prevent corona infection is likely to dengerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.