Join us

Coronavirus : कोरोना रुग्णालयांसाठी नोडल ऑफिसर म्हणून विनिता सिंघल यांची नेमणूक  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 2:51 PM

Coronavirus : मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र सातशे खाटांच्या कोरोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई :  जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथे कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे  अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली.

जे. जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात 300 खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि 60 खाटांचा आयसीयू विभाग असेल त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात 250  खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि 50  खाटांच्या आयसीयू विभागाची  व्यवस्था करण्यात येत आहे. ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत. मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र सातशे खाटांच्या कोरोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी 100 खाटा आयसीयू साठी असतील अशी माहितीही अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नयेत, अशा परिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरिकांना सेवा द्यावी, अशी सूचना करतानाच संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबिरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून, 19 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचे सांगत राज्यात सध्या १३५ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : प्रिय बाबा... पंतप्रधान मोदींनी शेअर केला लेकीचा ‘तो’ व्हिडीओ

Coronavirus : कोरोनाचा गुगल, फेसबुकला फटका; तब्बल 4400 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता

Coronavirus: देशासाठी सदैव तत्पर! कोरोनाग्रस्तांसाठी CRPF चा पुढाकार, 33 कोटी 81 लाखांची केली मदत

Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव, कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर

Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईहॉस्पिटलअमित देशमुख