coronavirus: विशेष ट्रेनसाठी प्रतीक्षा यादीची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 12:30 AM2020-05-15T00:30:16+5:302020-05-15T00:30:50+5:30

रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले. लॉकडाउनच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी १२ मेपासून काही ठरावीक मार्गांवर विशेष ट्रेन धावत आहेत.

coronavirus: waiting list for special trains | coronavirus: विशेष ट्रेनसाठी प्रतीक्षा यादीची सोय

coronavirus: विशेष ट्रेनसाठी प्रतीक्षा यादीची सोय

googlenewsNext

 मुंबई : रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १५ शहरांसाठी विशेष गाड्या धावत आहेत. या विशेष ट्रेन सुरू करण्याच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वे मंत्रालयाने तिकिटांसाठी प्रतीक्षा यादी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, विशेष ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना प्रतीक्षा तिकीट काढता येईल.
रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले. लॉकडाउनच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी १२ मेपासून काही ठरावीक मार्गांवर विशेष ट्रेन धावत आहेत. अनेक विशेष गाड्यांमधील सीट रिकाम्या राहिल्यामुळे आणि प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यामुळे ही सीट वाया जाऊ नये, आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्यानुसार, २२ मेपासून धावणाºया विशेष गाड्यांचे आरक्षण १५ मे रोजी करता येईल. या गाड्यांना प्रतीक्षा तिकीट देण्यात येणार असले तरी आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट नसेल.

श्रेणी (क्लास) प्रतीक्षा
यादीची मर्यादा
प्रथम श्रेणी एसी २०
एक्झिक्युटिव्ह डबे २०
द्वितीय श्रेणी एसी ५०
तृतीय श्रेणी एसी १००
एसी चेअर कार १००
स्लीपर क्लास २००

Web Title: coronavirus: waiting list for special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.