मुंबईः जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत 179 देशांना विळखा घातला असून, 11267 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236वर पोहोचली आहे. त्यामुळे अनेकांना चिंतेनं ग्रासलं आहे. रविवारी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली असून, त्यानिमित्तानं देशभरातील रेल्वेच्या 4000 गाड्या बंद राहणार आहेत. यात 2400 पॅसेंजर तर, 1300 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.खासगी कार्यालये पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देताच वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या परप्रांतीयांनी आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरुवात केली. कोकणातील चाकरमानीही गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे गेले चार दिवस कमी गर्दी असलेल्या मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांसाठी रांगा लागल्याचे दिसून आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी कोकणवासीयांना विनंती केली आहे. सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे निघाले आहेत. या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरी राहावे, कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे! ही वेळ सुट्टी नाही आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याची आहे, असंही ट्विट करत नितेश राणे म्हणाले आहेत.
Coronavirus : ही वेळ सुट्टीची नाही; आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याची, नितेश राणेंची कोकणवासीयांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 7:57 AM
रविवारी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली असून, त्यानिमित्तानं देशभरातील रेल्वेच्या 4000 गाड्या बंद राहणार आहेत. यात 2400 पॅसेंजर तर, 1300 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
ठळक मुद्देकोरोना व्हायरसने आतापर्यंत 179 देशांना विळखा घातला असून, 10049 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236वर पोहोचली आहे. रविवारी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली असून, त्यानिमित्तानं देशभरातील रेल्वेच्या 4000 गाड्या बंद राहणार आहेत.