CoronaVirus: आम्हाला काय होतंय... म्हणत बाहेर पडणाऱ्यांची धडपड सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:07 AM2020-04-30T01:07:33+5:302020-04-30T01:07:45+5:30

मुंबईकरांसाठी ३ पोलिसांना जीव गमवावा लागला. तरीदेखील काही मंडळी स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत.

CoronaVirus: What is happening to us? | CoronaVirus: आम्हाला काय होतंय... म्हणत बाहेर पडणाऱ्यांची धडपड सुरूच

CoronaVirus: आम्हाला काय होतंय... म्हणत बाहेर पडणाऱ्यांची धडपड सुरूच

Next

मुंबई : आम्हाला काय होतंय... म्हणत आजही विविध झोपडपट्टीसह टोलेजंग इमारतीमधील मंडळी रस्त्यावर उतरताना दिसते आहे. मुंबईकरांसाठी ३ पोलिसांना जीव गमवावा लागला. तरीदेखील काही मंडळी स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपायांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या ४० दिवसांत मुंबईत १० हजार ४०८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात, मास्क न लावता घराबाहेर पडलेल्यांविरुद्ध १२३८ गुन्हे नोंद आहेत.
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांहून अधिक आहे. तर दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या परिस्थितीतदेखील काही भागात नागरिक मोकाट वावरताना दिसताहेत. वांद्रे, धारावी, शिवाजीनगर, कुर्ला भागात नागरिकांची गर्दी पाहावयास मिळते. येथील परिस्थितीवर नियंत्रण आणणाºया पोलिसांनाच टार्गेट केले जात आहे. अशाच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी ड्रोनद्वारे लक्ष ठेवत कारवाई सुरू आहे. तरीदेखील काही महाभाग विनाकारण घराबाहेर भटकताना दिसताहेत. यासाठी अजून कडक नियमांची आवश्यकता आहे़
>नागरिकांनो घरी राहा सुरक्षित राहा; पोलिसांचे आवाहन
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून वेळोवेळी ‘नागरिकांना घरी राहा... सुरक्षित राहा’ असे सांगण्यात येत आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
असेही मार्ग
अनेक मंडळी गच्ची, पार्किंग लॉटमध्ये एकत्र येत टेहळणी करतात. तर काही ठिकाणी कॅरम, ल्युडोचे खेळ रंगताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणतानाही पोलिसांची दमछाक होत आहे.
>काहींना जामीन काहींचा शोध
मंगळवारपर्यंत मुंबईत १० हजार ४०८ जणांविरुद्ध ५ हजार ४५६ गुन्हे नोंद आहेत. यापैकी ६ हजार ५१३ आरोपींना अटक करत जामिनावर सोडण्यात आले आहे. तर १२३४ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. २६३१ जणांना नोटीस देत सोडण्यात आले आहे. यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ३ हजार ६४६ गुन्हे नोंद आहेत. तर अवैध वाहतूक प्रकरणी ८१८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
आतापर्यंतच्या दाखल गुन्ह्यात कोरोना संशयितांविरुद्ध १२ गुन्हे दाखल झाले आहेत. तर हॉटेल आस्थापना ४४, पान टपरी ४१, इतर दुकाने हॉकर्स/ फेरीवाले २२७ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे कोरोनाला लवकर हरवायचे असेल तर घरी राहणे हा एकमेव पर्याय असल्याचे यंत्रणांचे म्हणणे आहे.

Web Title: CoronaVirus: What is happening to us?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.