मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा देशात सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, त्यामुळे उद्योग-व्यवहार आणि जनतेला थोडी मोकळीक दिली असली तरी लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आलेले नाही. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे कधी उठणार असा प्रश्न लोकांना पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहे.राज्याला कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्यात येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक नुकतीच झाली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन हटवण्याची कुठलीही घाई नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. उलट ज्या ठिकाणी लॉकडाऊन हटवण्याची घाई करण्यात आली. तिथे पुन्हा लॉकडाऊन केले गेले पाहिजे, असे संकेतच उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले.कोरोनाची लागण कुणालाही होऊ शकते. अशा परिस्थितीत अतिआत्मविश्वास बाळगणे योग्य नाही. राज्यातील जनतेमध्ये कोरोनाबातत बराच संभ्रम आहे. राज्यात कोरोनाची पहिली लाट आली आहे. आता दुसरी लाट येऊ द्यायची नाही आहे. त्यामुळेच राज्यात संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याऐवजी मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा फैलाव अद्यापही वेगाने सुरू आहे. राज्यात आज ११ हजार १११ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ८८३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात १ लाख ५८ हजार अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी