- मनोहर कुंभेजकर मुंबई : आयुष मंत्रालय, दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड १९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत आहे, असे नमूद आहे. या अनुषंगाने या औषधाचे वितरण करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी प्राप्त करून घेण्यात आली आहे. अर्सेनिक अल्बम ३०च्या सुमारे २० लाख गोळ्या क्वारंटाइन सेंटरसह मोफत वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेच्या के पश्चिम व जी उत्तर वॉर्डमधील नागरिकांना या औषधाचे वितरण कारण्यासंदर्भात पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी पत्र जारी केले आहे.हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून, आम्हाला अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या मिळणार तरी कुठे, अशी विचारणा नागरिक लोकप्रतिनिधींना करत आहेत. मंगळवारी सकाळपासून आपल्याला किमान १० ते १५ नागरिकांकडून हे औषध कुठे मिळणार अशी विचारणा झाली, अशी माहिती पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. तर अशा प्रकारची विचारणा आपल्याकडे उत्तर मुंबईतील अनेक नागरिकांनी केल्याचे खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, तर वर्सोव्याच्या आमदार डॉ. लव्हेकर यांनीसुद्धा आपल्याला या औषधाची विचारणा करणारे आज अनेक फोन आले, असे त्यांनी सांगितले. नागरिकांना या औषधाच्या वितरणाबद्धल आम्ही काय उत्तरे द्यायची, या औषधाचे मोफत वितरण पालिका कसे करणार, असे सवाल आपण डॉ. केसकर यांना केल्याचे शीतल म्हात्रे म्हणाल्या.पालिका कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांचे पत्रयासंदर्भात डॉ. पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, सदर औषध हे आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार नागरिकांना पालिका उपलब्धतेनुसार मोफत देणार आहे. सध्या आम्हाला होमिओपॅथी डॉक्टर सदर औषध उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी आरोग्य अधिकाºयांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, आम्हाला अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या मिळणार कुठे, अशी विचारणा नागरिक लोकप्रतिनिधींनाकरत आहेत.
coronavirus: बहुचर्चित अर्सेनिक अल्बम ३० औषध आम्हाला मिळणार तरी कुठे? नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 2:49 AM