मुंबई : १९१८-१९ मध्ये फ्लूच्या साथीने १ कोटी ८० लाख भारतीयांसह जगभरातील ५ कोटी रुग्णांचा बळी घेतला होता. त्या वेळी प्लाझ्मा थेरपीमुळे ही साथ नियंत्रणात आली होती असा दावा जगातील काही संशोधकांकडून केला जात आहे. आता हीच थेरपी कोरोनावरही ‘रामबाण’ इलाज ठरेल का, याची चाचपणी जगभरात सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारलाही त्यासाठी परवानगी मिळाली आहे. पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयासह दिल्ली, जयपूर, सुरत, तिरूअनंतपूरम इथे चाचण्या सुरू होत आहेत. तर, जर्मनी, अमेरिका, चीन यांसारख्या अनेक देशातून सकारात्मक बातम्या येत आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाले तर कोरोनाविरुद्धच्या लढाईतील मोठे ‘अस्त्र’ हाती लागणार आहे.प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेच्या चाचण्या जागतिक आरोग्य संघटनेसह विविध देशांमध्ये सुरू झाल्या आहेत. प्लाझ्मा ही नवीन थेरपी नाही. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यावर संशोधन सुरू होते. या थेरपीचा शोध लावणारे जर्मनीचे डॉक्टर वॉर्न डेनिंग यांना १९०१ साली नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला होता. विशेष म्हणजे मेडिकल क्षेत्रासाठी दिलेले ते पहिले नोबेल होते. ही थेरपी स्पॅनिश फ्लू, इबोला यांच्यारख्या साथीच्या आजारांमध्ये परिणामकारक ठरली होती.कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा देऊन त्यांच्या प्रतिकार शक्तीत सुधारणा करणे असे या थेरपीचे ढोबळ वर्णन करता येईल. प्लाझ्मामधील रक्तपेशींमध्ये अॅण्टीबॉडीजदेखील (प्रतिजैविकक) असतात. त्या आजारास कारणीभूत ठरणाºया पेशींना प्रतिकार करून परतवून लावण्याचा प्रयत्न करतात. त्यात यश आले की पुन्हा तशाच रोगाचे आक्रमण झाले तर रक्तपेशी त्याला वेळीच प्रतिकार करतात. करोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्माचा वापर करून करोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया (डीजीसीआय) यांनी काही नियम तयार केले आहेत. पुणे, सुरत, जयपूर आणि तिरूअनंतपूरम या शहरांमधील वैद्यकीय महाविद्यालयांना त्या नियमावलीच्या आधारे या थेअरीच्या चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यासाठी आवश्यक पूर्व तयारी झाली असून आयसीएमआरने ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर निवडक रूग्णांवर उपचार सुरू केले जातील.>सरसकट सर्वांवर उपचार करणे अशक्यया थेरपीचे कोणत्या रुग्णांवर कसे परिणाम होतील याचा कोणताही अंदाज बांधता येत नाही. त्याशिवाय प्लाझ्मा देणारा आणि घेणारा यांचे वय, त्यांच्यातील आजाराची लक्षणे अन्य शारीरिक व्याधी यांचाही मेळ असणे आवश्यक असते. त्यामुळे सरसकट सर्व रुग्णांवर त्या पद्धतीने उपचार करता येणार नाहीत; परंतु अशा थेरपीच्या चाचण्या घेतल्याशिवाय त्यांची परिणामकारकताही समजणार नाही. त्यामुळे अत्यंत नियंत्रित पद्धतीने (कॉन्वालेसंट) आणि सर्वोत्तम व्यवस्थेत या चाचण्या करून त्याचे यश-अपयश ठरवावे लागेल.- डॉ. हृषीकेश वैद्य, इंटेसिव्हिस्ट, होरायझन हॉस्पिटलयश येण्याची शक्यता जास्तया आजारवर तूर्त कोणतेही रामबाण औषध नाही. फ्लू, टीबी यांसारख्या आजारांना ओळखणारी व्यवस्था आपल्या शरीरात असते. तशीच कोरोनाला ओळखणारा प्लाझ्मा जर बरे झालेल्या व्यक्तीकडून रुग्णाला उसनवारीने मिळाला तर त्यातून रोगावर मात करणे शक्य होईल. त्यामुळे हे प्रयत्न यशस्वी ठरतील, अशी आशा आहे.- डॉ. दिनकर देसाई, राष्ट्रीय अध्यक्ष, पॅथलॉजिस्ट असोसिएशन
Coronavirus : कोरोनावर प्लाझ्मा थेरपी ठरेल रामबाण?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 5:13 AM