मुंबई : पहिला हॉटस्पॉट ठरलेला वरळी विभाग आता कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जास्तीतजास्त लोकांची तपासणी, संस्थात्मक विलगीकरण तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप अशा विविध उपक्रमानंतर वरळीमधील प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे वरळी, लोअर परळ, प्रभादेवी या जी दक्षिण विभागात आता केवळ पाच बाधित क्षेत्र शिल्लक आहेत. तर १६६ इमारती प्रतिबंधित आहेत.दाटीवाटीच्या लोकवस्ती ही या विभागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्यास कारणीभूत ठरली. त्यात जवळच्या संपकार्तील लोकांचे सुरुवातील तात्काळ विलगीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे जी दक्षिण विभाग कोरोनाचा हॉट स्पॉट बनला. अखेर प्रभावी क्वारंटाइन, सार्वजनिक शौचालयांमध्ये निर्जंतुकीकरण, घरोघरी तपासणी, ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी अशा उपक्रमानंतर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे. आता वरळीत रुग्णसंख्या ८७ दिवसांनंतर दुप्पट होत आहे. तर दैनंदिन सरासरी वाढ ०.८० पर्यंत खाली आली आहे.जी दक्षिण विभागात आता ६५१ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ५३८६ लोकांना कोरोना झाला होता. यापैकी ४३६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येण्यासाठी संशयित व्यक्तीवर विभागातच क्वारंटाइन, उपचार करता यावेत यासाठी वरळी ‘एनएससीआय’ डोममध्ये २४२० खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली. तर पोदार रुग्णालयात ९५१ रुग्ण दाखल करण्यात आले. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यामुळे आता पोदार येथे ११५ रुग्ण तर ‘एनएससीआय’ येथे ३१० रुग्ण उपचार घेत आहेत.दाटीवाटीच्या लोकवस्ती ही या विभागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्यास कारणीभूत ठरली. संपर्कातील लोकांचे सुरुवातील तत्काळ विलगीकरण होऊ शकले नाही.
CoronaVirus News: वरळीत आता केवळ पाच कोरोनाबाधित क्षेत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 4:59 AM