चिंताजनक! मुंबईवर कोरोनाचे वाढते संकट; दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 08:49 PM2020-05-05T20:49:38+5:302020-05-05T20:54:23+5:30
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनेही झोप उडविली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईमध्ये सापडत आहेत.
मुंबई : आज दिवसभरातील देशातील कोरोना ग्रस्तांचा आकडा भीतीदायक असताना मुंबईतूनही रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. आज मुंबईत दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त सापडले असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आकडेवारी अद्याप आलेली नाही.
देशात कोरोनाचे एकूण ४६४३३ रुग्ण झाले असून गेल्या २४ तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे. या काळात देशभरात ३९०० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर १०२० रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक म्हणजे आज सर्वाधिक १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची सरासरी वाढली असून ती 27.41% झाली आहे.
635 new #COVID19 positive cases, 26 deaths recorded in Mumbai today, taking the total number of positive cases to 9758, death toll 387: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/ZLP1KXV3RV
— ANI (@ANI) May 5, 2020
मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनेही झोप उडविली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईमध्ये सापडत आहेत. मुंबईत आज दिवसभरात ४०६ जणांना संभाव्य कोरोनाबाधित म्हणून भरती करण्यात आले आहे. तर आज ६३५ रुग्ण सापडले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२० असून एकूण २१२८ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
मृतांची संख्या २६ झाली असून आजपर्यंतचा मुंबईतील बळींचा आकडा ३८७ वर गेला आहे.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ
CoronaVirus अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधानांना राहुल गांधींचा सल्ला
किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले
चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण
दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल