मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गात दररोज 90 ते 100 गुन्ह्यांची नोंद होते. मात्र 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. परिणामी, रेल्वे परिसरात होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांच्या नोंदी शून्यावर आल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे मंत्रालयाने मुंबईची उपनगरीय लोकल, देशातील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, कोलकता मेट्रो 14 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवेळी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने प्रवासी दिसत होते. मात्र आता प्रत्येक रेल्वे स्थानकावर शुकशुकाट पसरला आहे. प्रवासी नसल्याने गुन्हेगारीच्या घटना बंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उपनगरीय रेल्वे मार्गावरील पोलीस ठाण्यात मोबाइल चोरी, हाणामारी, मौल्यवान वस्तू चोरी, अपहरण, बलात्कार, खून, फसवणूक, विनयभंग यांसारख्या अनेक गुन्ह्याची दररोज नोंद होते. यामध्ये सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना असतात. मात्र कोरोना विषाणूंचा प्रसार वाढल्याने लोकल बंद झाली. परिणामी, गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारे चोर गायब झाले. ज्या दिवसापासून लोकल बंद झाल्या आहेत. त्या दिवसापासून गुन्ह्याच्या नोंदी शून्यावर आल्या आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : पंतप्रधान मोदींच्या 'लॉकडाऊन' भाषणाने मोडले सर्व रेकॉर्ड, तब्बल इतक्या लोकांनी पाहिलं
Coronavirus : कोरोनामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले, डाळींनी ओलांडली शंभरी
Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यू
Coronavirus : कोरोना अलर्ट! ‘या’ धोकादायक वेबसाईटवर चुकूनही करू नका क्लिक
Coronavirus : धक्कादायक! ‘कोरोना पसरवूया’, इंजिनिअरच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टने खळबळ
Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू