कोरोनाबाधित रुग्णाच्या नशीबी पायपीट, रुग्णवाहिका आली नसल्याने चालत गाठले रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 07:01 PM2020-05-21T19:01:56+5:302020-05-21T19:03:43+5:30

सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली मदतीसाठी धाव

coronavirusnews : coronary patient reached the hospital on foot as the ambulance did not arrive dombivali MMG | कोरोनाबाधित रुग्णाच्या नशीबी पायपीट, रुग्णवाहिका आली नसल्याने चालत गाठले रुग्णालय

कोरोनाबाधित रुग्णाच्या नशीबी पायपीट, रुग्णवाहिका आली नसल्याने चालत गाठले रुग्णालय

Next

कल्याण -डोंबिवलीत एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल पॉङिाटीव्ह आला. त्याने स्वत: हून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर कोरोना रुग्णालयाशी संपर्क साधला. मात्र रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शक्य असल्यास चालतच रुग्णालयात यावे असा सल्ला दिला. अखेर कोरोनाग्रस्त या तरुणाने स्वत: पाटपीट करीत रुग्णालये गाठले. यावेळी त्याच्या मदतीला काही सामाजिक कार्यकर्ते धावून आल्याने त्याला थोडाफार धीर मिळाला. या घटनेतून महापालिकेचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. सामान्यांकडून या घटनेविषयी तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

मुंबईतील वाडिया रुग्णालयात वार्डबॉयचे काम करणारा तरुण हा डोंबिवलीतील भरत भोईर निवास येथील गोपाळ भवन येथे राहतो. त्याला कोरोना लागण झाल्याची लक्षणो आढळून आल्याने त्याची मुंंबईच्या रुग्णालयात टेस्ट करण्यात आली. काल सायंकाळी त्याच्या वैद्यकीय अहवाल आला. त्याला मुंबईतून कळविण्यात आले की, तुमचा अहवाल आला आहे. त्याचा अहवाल आज सकाळी त्याला पाठविण्यात आला. सकाळी आठ वाजता त्याने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयास संपर्क साधला. त्याचा अहवाल पॉङिाटीव्ह आला आहे. त्याला घेण्यासाठी रुग्णवाहिका पाठवा. रुग्णालयातील डॉक्टरने साडे अकरा वाजेर्पयत त्याला रुग्णवाहिका पाठविला नाही. कोरोनाचा अहवाल पॉङिाटीव्ह आल्याने धास्तावलेल्या रुग्णाने प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. म्हात्रे यांनी रुग्णालयास संपर्क साधून रुग्ण रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला चालता येत असल्यास त्याला रुग्णालयात चालत येऊ द्या असे सांगितले. म्हात्रे यांनी वकिल गणोश पाटील, संदीप सामंत, मनोज वैद्य, राजा चव्हाण, युगेश भोईर यांनी सोशल डिस्टींग ठेवून रुग्णाला रुग्णालयाच्या दिशेने चालत जाण्यास मदत केली. रुग्ण रस्त्यात चक्कर येऊन पडल्यास त्याच्या मदतीसाठी रस्त्यावरील अन्य लोक  मदतीला धाऊन येतील. त्यांना तर माहित नसेल  हा रुग्ण कोरोना पॉङिाटीव्ह आहे. त्यामुळे या तरुणांनी त्याला धीर देत रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहचल्यावर त्याला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाने आत घेतले नाही. बाहेर थांबवून ठेवले. पायपीट करुन आलेल्या रुग्णाला रुग्णालयाबाहेर तीन तास टाळकत ठेवल्यावर अखेरीस 3 वाजता रुग्णवाहिका करुन भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्र येथे नेऊन भरती केले.

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रुग्णालयात चार रुग्णवाहिका आहेत. ज्यावेळी रुग्णालयात रुग्णाने रुग्णवाहिकेसाठी फोन केला तेव्हा या चारही रुग्णवाहिका अन्य ठिकाणी रुग्णांना घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे 11 वाजता रुग्णवाहिका पाठविली जाईल असे सांगितले होते.
 

Web Title: coronavirusnews : coronary patient reached the hospital on foot as the ambulance did not arrive dombivali MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.