मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, डेक्कन अन् राजधानी एक्सप्रेसह 23 गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:59 PM2020-03-17T17:59:15+5:302020-03-17T18:36:52+5:30
मध्य रेल्वेकडून अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ अशा शहरांना जोडणाऱ्या एकूण 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
मुंबई - कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे मुंबईतील गर्दी टाळण्यासाठी लोकलसेवा बंद करण्याचा विचार सरकार करत आहे. मात्र, लोकलसेवा ही मुंबईची लाईफलाईन असल्याने तुर्तास लोकलसेवा चालूच राहणार असल्याचं समजते. त्याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी 23 गाड्या रद्द केल्या आहेत. उद्या म्हणजेच 18 मार्चपासून ते 1 एप्रिल पर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत असलेल्या प्रवाशांना आजच मुंबईतून बाहेर जाता येईल.
Trains cancelled due #COVID19 preventive measure and non-occupancy. pic.twitter.com/NdGgrrR9Gv
— Central Railway (@Central_Railway) March 17, 2020
मध्य रेल्वेकडून अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ अशा शहरांना जोडणाऱ्या एकूण 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात राजधानी एक्सप्रेसचादेखील समावेश आहे. सोबत डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, हावडा दुरांतो, नंदीग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या रद्द करण्यात आल्याने मुंबईकडे येणारा मोठा प्रवाशी वर्ग कमी होऊन गर्दी टाळता येऊ शकते. त्याच, पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरमधून सुटणाऱ्या लांबपल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही शहरातून एकूण 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.