Join us

मुख्य लिपिक पदाची परीक्षा पुढे ढकलण्याची महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:06 AM

मुंबई : १६, १७ व १८ एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहायक पदासाठी ...

मुंबई : १६, १७ व १८ एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहायक पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या परीक्षेला सुमारे २ हजार ७०० कर्मचारी बसले आहेत. यामुळे परीक्षेदरम्यान अनेकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता या कर्मचाऱ्यांनी वर्तविली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परीक्षेला बसू इच्छिणा-या अनेक कर्मचाऱ्यांना कोणाची लागण झाली असल्याने ते उपचार घेत आहेत. तर काही जण क्वारंटाइन आहेत. काही जणांच्या इमारती सील केल्या असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य नाही. तर यापैकी अनेक जण कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल या भीतीने स्वतःची कोरोना चाचणी करून घेत नाहीत. यामुळे या परीक्षा पुढे ढकलायला हव्यात, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.