पालिका सहयोगी प्राध्यापकांची शंभर पदे भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:07 AM2021-01-22T04:07:43+5:302021-01-22T04:07:43+5:30
मुंबई : पालिकेच्या केईएम, सायन, नायर या प्रमुख रुग्णालयांसह सर्वसाधारण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये याठिकाणी रिक्त असलेल्या सहयोगी प्राध्यापकांच्या १०५ ...
मुंबई : पालिकेच्या केईएम, सायन, नायर या प्रमुख रुग्णालयांसह सर्वसाधारण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये याठिकाणी रिक्त असलेल्या सहयोगी प्राध्यापकांच्या १०५ पदांपैकी १०० पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्रवीणा मोरजकर यांनी दिली.
पालिका वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये याठिकाणी शिकवण्यासाठी आणि रुग्णांवरील उपचारांकरिता साहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक यांची ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. यामध्ये, सहयोगी प्राध्यापकांची १०५ पदे रिक्त असून, त्यापैकी १०० पदे तातडीने भरण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. सहयोगी प्राध्यापकांना एक लाख ८२ हजार ते दोन लाख २४ हजार १०० इतके मासिक वेतन दिले जाणार आहे.