महापालिकेचा फैसलाही 19 ऑक्टोबरलाच

By admin | Published: October 12, 2014 02:56 AM2014-10-12T02:56:10+5:302014-10-12T02:56:10+5:30

शिवसेना-भाजपा युतीच्या ताटातुटीनंतर विधानसभेत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आह़े

The corporation's decision will be decided on October 19 | महापालिकेचा फैसलाही 19 ऑक्टोबरलाच

महापालिकेचा फैसलाही 19 ऑक्टोबरलाच

Next
>मुंबई : शिवसेना-भाजपा युतीच्या ताटातुटीनंतर विधानसभेत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आह़े मात्र या निवडणुकीतील गणितांवरच महापालिकेतील सत्तेचे समीकरण टिकलेले आह़े त्यामुळे 19 वर्षाच्या या सत्तेचा बुरूज 19 ऑक्टोबर रोजी ढासळतोय का तरतोय? याची उत्सुकताही वाढू लागली आह़े
मुंबई महापालिकेवर 17 वर्षे राज्य करणा:या या युतीने असंख्य धुसफुशीनंतरही 2क्12च्या पालिका निवडणुकीत मैत्री कायम ठेवली़ मात्र विधानसभा निवडणुकीत तिकीटवाटपादरम्यान ही युती फुटताच महापालिकेतही अस्वस्थता वाढली़ केवळ युतीमुळे मूग गिळून गप्प राहणारे भाजपाचे सदस्यही शिवसेनेला ताकद दाखविण्याची भाषा करू लागल़े सत्तेसाठी महापालिकेत युती कायम ठेवली, तरी शिवसेनेला सहकार्य करणार नाही, अशी भूमिकाही भाजपाने बोलून दाखविली़  
एवढेच नव्हेतर सदस्य संख्येअभावी सुधार समितीची बैठकही तहकूब करावी लागली़ पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात पालिकेतील वैधानिक व विशेष समित्यांच्या निवडणुका आहेत़ 
संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना प्रत्येक खेपेस या निवडणुकांमध्ये भाजपाच्या तोंडाला पाने पुसत होती़ त्यामुळे या निवडणुकांमध्ये शिवसेनेला पाणी पाजण्याचे मनसुबेही भाजपा नेत्यांनी आखले आहेत़ मात्र निवडणुकांमध्ये कोणाची ताकद किती वाढते, यावर पुढची गणिते अवलंबून असल्याने उभय नेत्यांनी 19 ऑक्टोबर्पयत सबुरीचा मार्ग धरला आह़े 
 
सर्व अधिकार 
महापौरांकडे
पालिकेत शिवसेनेचे 75 सदस्य आहेत; तर भाजपाचे 31 सदस्य आहेत़ भाजपाने बाहेर पडायचे ठरविल्यास त्यांना अविश्वास ठराव आणावा लागेल़ परंतु या ठरावाबाबतचा अधिकार महापौरांकडे असतो़  महापौर स्नेहल आंबेकर या शिवसेनेच्या आहेत़ 
भाऊबंदकीची शक्यता
सेनेला सत्ता स्थापना करण्यासाठी 112 संख्याबळ लागेल़ यापैकी 75 सेनेचे सदस्य असून, महापौरपदाच्या निवडणुकीत 15 अपक्ष नगरसेवकांनी आपली मते युतीच्या पारडय़ात टाकली होती़ तसेच वेळ पडल्यास मनसे भाऊबंदकी जपेल, असे बोलले जात आह़े
 

Web Title: The corporation's decision will be decided on October 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.