Join us

स्वतः गाडी चालवत नगरसेविकेने महापालिका अधिकाऱ्यांना घडवली आज खड्डे सफर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:11 AM

मुंबई : गणपती बाप्पाचे आगमन ३ दिवसांवर येऊन ठेपले असताना आणि वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा मुंबई महानगरपालिकेचे रस्ते विभागाचे अधिकारी ...

मुंबई : गणपती बाप्पाचे आगमन ३ दिवसांवर येऊन ठेपले असताना आणि वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा मुंबई महानगरपालिकेचे रस्ते विभागाचे अधिकारी सुस्त आणि नागरिक त्रस्त, अशी स्थिती आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, अशी स्थिती आहे. भाजपाच्या प्रभाग क्रमांक ५२ च्या नगरसेविका प्रीती सातम यांनी गांधीगिरी करत चक्क पालिकेच्या संबंधित अधिकारी वर्गाला सोबत घेऊन आणि स्वतः गाडी चालवत खड्ड्यांमुळे होणारा त्रास काय आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची विनंती केली.

पुढील २ दिवसांत सर्व खड्डे भरून रस्ते पूर्ववत केले जातील, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. जर रस्ते पूर्ववत नाही झालेत, तर मग याच खड्ड्यांत आंदोलन करू, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

यावेळी सहायक अभियंता परिरक्षण विभागाचे प्रकाश तांबे, दुय्यम अभियंता परिरक्षण विभागाचे श्रीरंग धर्माधिकारी, रस्ते अभियंता परिरक्षण विभागाच्या निशा दळवी आणि कनिष्ठ अभियंता परिरक्षण विभागाचे दत्ता येडले आदी अधिकारी उपस्थित होते.