CoronaVirus News in Mumbai: मुंबईकरांच्या पैशात होणार नगरसेवक, कुटुंबीयांची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 12:39 AM2020-05-02T00:39:06+5:302020-05-02T00:39:26+5:30

मुंबईतील २२७ वॉर्डमधील कोरोनाची लक्षणे आढळणाºया नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांची ‘कोव्हिड- १९ टेस्ट’ खासगी लॅबमधून करून घेण्याचे विशेष आदेश महापालिका आयुक्तांनी २४ वार्डमधील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

Corporators and their families will be tested at the expense of Mumbaikars | CoronaVirus News in Mumbai: मुंबईकरांच्या पैशात होणार नगरसेवक, कुटुंबीयांची चाचणी

CoronaVirus News in Mumbai: मुंबईकरांच्या पैशात होणार नगरसेवक, कुटुंबीयांची चाचणी

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : कोरोना संकटावर मात करण्यासाठी एका बाजूला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान रीलिफ फंडांत मदतीचे आवाहन करण्यात येत आहे; तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील २२७ वॉर्डमधील कोरोनाची लक्षणे आढळणाºया नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांची ‘कोव्हिड- १९ टेस्ट’ खासगी लॅबमधून करून घेण्याचे विशेष आदेश महापालिका आयुक्तांनी २४ वार्डमधील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. याचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून दिला जाणार आहे. तर रेड झोनमध्ये काम करणाºया पालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचणीबाबत काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याने याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे असली तरच त्याची चाचणी करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र गुरुवारी पालिकेच्या परिमंडळ सातचे एक सूचनापत्रक व्हायरल झाले होते. ज्यात नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांची कोव्हिड चाचणी करून त्याचे अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात यावेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर त्या सूचनेत दुरुस्ती करून निव्वळ लक्षणे असणाºयांच्याच टेस्ट करण्यात याव्यात, असे म्हणण्यात आले. मुंबईतील २४ वॉर्डमधील २२७ नगरसेवकांपैकी ज्यांना लक्षणे आढळतील त्यांची आणि कुटुंबीयांची कोरोना चाचणी खासगी लॅबमध्ये करण्यात येणार आहे.
ज्याचा खर्च प्रत्येक व्यक्तीमागे साडेचार हजार रुपये इतका आहे. त्यानुसार जेवढ्या लोकांच्या चाचण्या होतील त्या सर्वांचा खर्च हा पालिकेकडून म्हणजे मुंबईकरांच्या खिशातून दिला जाणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
तसेच कोरोनाबाधित क्षेत्रात काम करणाºया आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला स्वत:ची कोरोना चाचणी करायची असल्यास लक्षणे दिसत नाहीत तोपर्यंत ती करण्यास परवानगी मिळत नाही.
>‘स्वॅब टेस्ट’ आणि परिसर सील करणाºयांचे काय?
कोरोना टेस्टसाठी घशातील स्वॅब घेणाºयांचा विचार कोणी करीत नाही. तसेच कोरोनाग्रस्त आढळलेले परिसर किंवा इमारत सील करताना असलेला धोकाही विचारात घेतला जात नाही. राजकारण्यांप्रमाणे आम्हाला सुरक्षा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. मात्र नगरसेवक, आमदार किंवा खासदार एखाद्या कोरोनाग्रस्त परिसराला किंवा रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयात भेट देताना पीपीई किट घालतात. स्वत:ची योग्य ती काळजी घेतात. त्यामुळे नेमका धोका कोणाला? याबाबत विचार करणे गरजेचे आहे. तसेच अद्याप किती नगरसेवक व राजकारणी कोरोना पॉझिटिव्ह आले याचाही विचार व्हावा. कारण हे सर्व लोक त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फतच अन्न आणिधान्यवाटपाचे काम करतात. मात्र पालिका आणि पोलीस कर्मचाºयांचे दरदिवशी बळी जात असून त्यांना कोणीच वाली नाही.
>लक्षणे असलेल्यांचीच होणार ‘टेस्ट’!
नगरसेवक हे अन्नवाटप करण्यासाठी प्रत्यक्षपणे फिल्डवर उतरत असल्याने त्यांना आणि परिणामी कुटुंबीयांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यातही ज्यांना लक्षणे आहेत त्यांचीच चाचणी करण्यास आम्ही प्राधान्य देणार असून तसे संबंधितांना स्पष्ट करण्यात आले आहे.
- विश्वास शंकरवार,
पालिका उपायुक्त, परिमंडळ ७
प्रिस्क्रिप्शन आणायचे कुठून?
कोरोनाची चाचणी स्वखर्चाने खासगी लॅबमध्ये करण्यासाठी डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने अजूनही बरेच खासगी दवाखाने बंद असून डॉक्टर त्या ठिकाणी येतच नाहीत. तर जे दवाखाने सुरू आहेत त्या ठिकाणीदेखील कोव्हिडचा अहवाल असल्याशिवाय दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणायचे तरी कुठून, असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.
- संतोष चिकणे, मुंबईकर

Web Title: Corporators and their families will be tested at the expense of Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.