नागरी समस्यांबाबत नगरसेवक उदासीनच

By admin | Published: August 31, 2016 04:02 AM2016-08-31T04:02:22+5:302016-08-31T04:02:22+5:30

महानगरातील खड्डे, देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग असे ज्वलंत प्रश्न मुंबईपुढे असताना रस्त्यांच्या नामकरणाचा नगरसेवकांचा सोस पाच वर्षांतही संपलेला नाही़

Corporators are unhappy about urban problems | नागरी समस्यांबाबत नगरसेवक उदासीनच

नागरी समस्यांबाबत नगरसेवक उदासीनच

Next

मुंबई : महानगरातील खड्डे, देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग असे ज्वलंत प्रश्न मुंबईपुढे असताना रस्त्यांच्या नामकरणाचा नगरसेवकांचा सोस पाच वर्षांतही संपलेला नाही़ अखेरच्या वर्षात हजेरीपट आणि दर्जेदार प्रश्नांबाबत बहुतांशी नगरसेवकांनी उदासीनता दर्शविल्याचा दावा प्रजा फाउंडेशन या बिगर शासकीय संस्थेने केला आहे. त्यांच्या प्रगतिपुस्तकावर बहुतांश नगरसेवकांना लाल शेरे मिळाले आहेत.
ऐन निवडणुकीपूर्वी तयार झालेल्या या अहवालामुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले असून त्यांच्या विरोधकांना मात्र तो प्रचारासाठी मुद्दा मिळणार आहे.
प्रजा फाउंडेशनने दरवर्षीप्रमाणे नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक मंगळवारी प्रकाशित केले़ सरलेल्या वर्षातही नगरसेवकांची कामगिरी उदासीन व निराशाजनक असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे़
पालिका स्तरावर न सुटणाऱ्या नागरी समस्या आमदार व खासदारांच्या सहकार्याने सोडविल्या जातात. त्यामुळे नगरसेवक असतानाच विधानसभा व संसदेत निवडून गेलेल्या प्रतिनिधींकडून विकासकामाच्या मोठ्या अपेक्षा असताना त्यांनी मुंबईकरांचा भ्रमनिरास केला आहे. आमदार व खासदार झाल्यानंतर त्यांनी पालिकेकडे पाठ फिरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे़(प्रतिनिधी)

सरासरी ५४ हजार नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांनी नागरी समस्यांकडे पालिका प्रशसानाचे लक्ष वेधणे अपेक्षित असते़ मात्र दहा नगरसेवक मौनीबाबा ठरले आहेत़ या नगरसेवकांनी आतापर्यंत एकही प्रश्न विचारलेला नसल्याचे आढळून आले आहे़ यामध्ये शिवसेनेचे खासदार व नगरसेवक असलेले राहुल शेवाळे, अपक्ष चंगेझ मुल्तानी आणि काँग्रेसचे ज्ञानराज निकम यांचा समावेश आहे़
सेनेचे सहा नगरसेवक मेरिटमध्ये आले आहेत़ मात्र मनसेच्या संतोष धुरी यांनी पहिला क्रमांक पटकावून सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे़ गेल्या वर्षी धुरी यांना सी श्रेणीत टाकण्यात आले होते़
तर फौजदारी गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवकांमध्ये शिवसेना आघाडीवर आहे़


टॉप पाच नगरसेवक
संतोष धुरी, मनसे
हेमांगी वरळीकर, शिवसेना
प्राजक्ता विश्वासराव, शिवसेना
तृष्णा विश्वासराव, शिवसेना
अनुराधा पेडणेकर, शिवसेना
वर्स्ट पाच नगरसेवक
राहुल शेवाळे, शिवसेना
चंगेझ मुल्तानी, अपक्ष
ज्ञानराज निकम, काँग्रेस
अविनाश सावंत, मनसे
हेमांगी वांगे, मनसे
चार वर्षांतील टॉप
हेमांगी वरळीकर, शिवसेना
संजय पवार, शिवसेना
नौशिर मेहता, काँग्रेस
अंजठा यादव, काँग्रेस
ज्ञानमूर्ती शर्मा, भाजपा

Web Title: Corporators are unhappy about urban problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.