मुंबई : महानगरातील खड्डे, देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग असे ज्वलंत प्रश्न मुंबईपुढे असताना रस्त्यांच्या नामकरणाचा नगरसेवकांचा सोस पाच वर्षांतही संपलेला नाही़ अखेरच्या वर्षात हजेरीपट आणि दर्जेदार प्रश्नांबाबत बहुतांशी नगरसेवकांनी उदासीनता दर्शविल्याचा दावा प्रजा फाउंडेशन या बिगर शासकीय संस्थेने केला आहे. त्यांच्या प्रगतिपुस्तकावर बहुतांश नगरसेवकांना लाल शेरे मिळाले आहेत.ऐन निवडणुकीपूर्वी तयार झालेल्या या अहवालामुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले असून त्यांच्या विरोधकांना मात्र तो प्रचारासाठी मुद्दा मिळणार आहे. प्रजा फाउंडेशनने दरवर्षीप्रमाणे नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक मंगळवारी प्रकाशित केले़ सरलेल्या वर्षातही नगरसेवकांची कामगिरी उदासीन व निराशाजनक असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे़पालिका स्तरावर न सुटणाऱ्या नागरी समस्या आमदार व खासदारांच्या सहकार्याने सोडविल्या जातात. त्यामुळे नगरसेवक असतानाच विधानसभा व संसदेत निवडून गेलेल्या प्रतिनिधींकडून विकासकामाच्या मोठ्या अपेक्षा असताना त्यांनी मुंबईकरांचा भ्रमनिरास केला आहे. आमदार व खासदार झाल्यानंतर त्यांनी पालिकेकडे पाठ फिरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे़(प्रतिनिधी)सरासरी ५४ हजार नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांनी नागरी समस्यांकडे पालिका प्रशसानाचे लक्ष वेधणे अपेक्षित असते़ मात्र दहा नगरसेवक मौनीबाबा ठरले आहेत़ या नगरसेवकांनी आतापर्यंत एकही प्रश्न विचारलेला नसल्याचे आढळून आले आहे़ यामध्ये शिवसेनेचे खासदार व नगरसेवक असलेले राहुल शेवाळे, अपक्ष चंगेझ मुल्तानी आणि काँग्रेसचे ज्ञानराज निकम यांचा समावेश आहे़सेनेचे सहा नगरसेवक मेरिटमध्ये आले आहेत़ मात्र मनसेच्या संतोष धुरी यांनी पहिला क्रमांक पटकावून सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे़ गेल्या वर्षी धुरी यांना सी श्रेणीत टाकण्यात आले होते़ तर फौजदारी गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवकांमध्ये शिवसेना आघाडीवर आहे़टॉप पाच नगरसेवकसंतोष धुरी, मनसेहेमांगी वरळीकर, शिवसेनाप्राजक्ता विश्वासराव, शिवसेनातृष्णा विश्वासराव, शिवसेनाअनुराधा पेडणेकर, शिवसेनावर्स्ट पाच नगरसेवकराहुल शेवाळे, शिवसेनाचंगेझ मुल्तानी, अपक्षज्ञानराज निकम, काँग्रेसअविनाश सावंत, मनसेहेमांगी वांगे, मनसेचार वर्षांतील टॉपहेमांगी वरळीकर, शिवसेनासंजय पवार, शिवसेनानौशिर मेहता, काँग्रेसअंजठा यादव, काँग्रेस ज्ञानमूर्ती शर्मा, भाजपा
नागरी समस्यांबाबत नगरसेवक उदासीनच
By admin | Published: August 31, 2016 4:02 AM