‘त्या’ नगरसेवकांचे नववर्ष ठाणे कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 02:29 AM2015-12-29T02:29:28+5:302015-12-29T02:29:28+5:30

सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या चारही नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या नगरसेवकांचे नवीन

The corporators' New Year in Thane Prison | ‘त्या’ नगरसेवकांचे नववर्ष ठाणे कारागृहात

‘त्या’ नगरसेवकांचे नववर्ष ठाणे कारागृहात

Next

ठाणे : सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या चारही नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या नगरसेवकांचे नवीन वर्ष ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातच उजाडणार आहे.
बांधकाम व्यावसायिक परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, मनसेचे सुधाकर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नजीब मुल्ला आणि काँग्रेसचे माजी गटनेते विक्र ांत चव्हाण यांना ११ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि.वि. बांबर्डे यांनी सोमवारी दिले.
या नगरसेवकांनी शरणागती पत्करल्यानंतर त्यांना सुरुवातीला नऊ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर तपासात विशेष प्रगती नसल्याचा मुद्दा ग्राह्य धरत चौघांनाही २८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली गेली. या कोठडीची मुदत सोमवारी संंपल्यामुळे सकाळी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्या. बांबर्डे यांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. नवीन वर्षाच्या स्वागताकरिता या नगरसेवकांची जामिनावर मुक्तता होईल, या
आशेने त्यांचे नातलग आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

न्यायालयाच्या नाताळ सुट्टीनंतर जामिन अर्ज शक्य
परमार प्रकरणात जामीन मिळावा, याकरिता या नगरसेवकांना आता मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी दिली असून त्याची मुदत ११ जानेवारीस संपत आहे.
तत्पूर्वी म्हणजे ३ जानेवारी २०१६ नंतर उच्च न्यायालयाची नाताळ सुटी संपल्यावर हे नगरसेवक जामिनाकरिता अर्ज करू शकतात.तात्पर्य, नववर्षाखेरीज या नगरसेवकांची ठाणे कारागृहातून सुटका होणे कठीण आहे.

Web Title: The corporators' New Year in Thane Prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.