लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:22+5:302021-07-01T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाहनांवरील दंड भरण्याच्या नावाखाली दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दहिसर वाहतूक पोलीस चौकीतील सहायक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहनांवरील दंड भरण्याच्या नावाखाली दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दहिसर वाहतूक पोलीस चौकीतील सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला. सुरेंद्र कारभारी घेगडमल (वय ५६) असे त्याचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय आहेत. २७ जून रोजी जेवणाची ऑर्डर पोहोचविण्यासाठी जात असताना कांदिवली जंक्शन येथे सिग्नल लागल्याने दुचाकी झेब्रा क्रॉसिंगवर लावल्याचे सांगत सुरेंद्रने त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली आणि दुचाकी दहिसर वाहतूक चौकीबाहेर लावण्यास सांगितले. तसेच त्याच्या वाहनावर ८ हजार रुपयांचा दंड असून, तो तासाभरात भरण्यास सांगितले. तक्रारदार तासभर चौकीबाहेरच थांबून राहिले. अखेर सुरेंद्रने दोन हजार भरून दोन हजार रुपयांची लाच देण्याची मागणी केली.
तक्रारदार यांना पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी याप्रकरणी २८ जून रोजी लेखी तक्रार दिली. २९ जूनला दोन हजारांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
...........................................