Join us

वाडा तालुक्यातील शेततळ्यात भ्रष्टाचार

By admin | Published: April 24, 2015 11:15 PM

तालुक्यातील गालतरे येथे कृषी विभागामार्फत शेततळी बांधण्यात आले. यात संबंधित कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांने संगनमत करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा

वाडा : तालुक्यातील गालतरे येथे कृषी विभागामार्फत शेततळी बांधण्यात आले. यात संबंधित कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांने संगनमत करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आदिवासी विचार मंचने केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.गावात आदिवासी शेतकऱ्यांसाठी १७ शेततळी खोदण्यात आली आहेत. मजूर उपलब्ध असतानाही यंत्राद्वारे खोदकाम करण्यात आले आहे. ही ही शेततळे ५० ते ६० हजार रुपयात पूर्ण झाले असून कृषी अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी संगनमत करून उर्वरित पैसे काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत ग्रामसभेत चर्चा झाली. त्यानंतर दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारा ठरावसुद्धा सभेत झाला असून उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना पत्र देऊन चौकशी मागणी करण्यात आली आहे. अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसून भ्रष्टाचार दडपण्यासाठी अधिकारी व राजकीय व्यक्तींकडून हस्तक्षेप होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी आदिवासी विचारमंचने केली आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी व्ही. वादे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.