मुंबई : आर्थिकदृष्ट्या २०१७ मध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. नोटाबंदी झाली, जीएसटी आले, पण याचा फारसा परिणाम झालेला नाही. नोटाबंदी केल्यामुळे भ्रष्टाचार अजूनही कमी झालेला नाही. आजही छोट्या छोट्या गोष्टींसाठी होणारा भ्रष्टाचार देशात सुरू आहे. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात होणाºया भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे. नोटाबंदी हा यावरील उपाय नाही, तसेच देशात जीएसटी लागू करण्यात आला, पण हा जीएसटी प्रत्यक्षातल्या जीएसटी प्रमाणे नसल्याचे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.आयआयटी बॉम्बेमध्ये सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात ‘आर्थिक क्रांती’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात पी. चिदंबरम यांच्यासह इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायणमूर्ती सहभागी झाले होते. गेल्या वर्षभरात आर्थिकदृष्ट्या प्रत्येक क्षेत्रात घट झालेली पाहायला मिळाली आहे. मे २०१४ ते आॅक्टोबर २०१७ मध्ये जागतिक पातळीवर क्रूड आॅइलचे दर तब्बल ४९ टक्क्यांनी घटले असतानाही पेट्रोल, डिझेलच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे, असे पी. चिदंबरम यांनी सांगितले. नारायण मूर्ती यांनी सध्या उच्च शिक्षितांनाही नोकºया मिळत नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, आयटी क्षेत्रात पगाराबाबत दरी निर्माण झाली आहे. उच्चपदस्थांचेच पगार वाढतात.
नोटाबंदीनंतरही भ्रष्टाचार कमी झालेला नाही- पी. चिदंबरम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 3:34 AM