पोलीस भरतीत केला पोलिसांनीच घाेटाळा! सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे मुलगा, मुलगी आणि जावई मेरिटमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 06:19 AM2022-11-08T06:19:06+5:302022-11-08T06:19:29+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी झालेल्या लेखी परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने जम्मू व काश्मीर पोलीस दलातील एक सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि सीआरपीएफचा एक हवालदार अशा दोन पोलिसांना अटक केली आहे.

corruption police recruitment exam | पोलीस भरतीत केला पोलिसांनीच घाेटाळा! सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे मुलगा, मुलगी आणि जावई मेरिटमध्ये

प्रातिनिधीक फोटो

googlenewsNext

मुंबई :

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी झालेल्या लेखी परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने जम्मू व काश्मीर पोलीस दलातील एक सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि सीआरपीएफचा एक हवालदार अशा दोन पोलिसांना अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या चौघांना अटक केल्यानंतर आता या घोटाळ्यातील एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या १३ झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलीस दलात पॅकेजिंग विभागात कार्यरत असलेल्या अशोक कुमार या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची कॉपी करत त्याची विक्री केली होती. याकरिता त्याने सीआरपीएफमध्ये हवालदार असलेल्या सुरेंद्र यादव याची मदत घेतली होती. या दोघांनी ५ ते १० लाख रुपयांना या प्रश्नपत्रिकेची विक्री केली होती. 

विशेष म्हणजे या लेखी परीक्षेमध्ये अशोक कुमार याचा मुलगा, मुलगी आणि जावई हे मेरिट लिस्टमध्ये आले होते. या प्रकरणी सीबीआयने ३३ ठिकाणी छापेमारी केली आणि या चौघांना अटक केली आहे. गेल्या मार्चमध्ये ही पोलीस भरती परीक्षा झाली होती. 

Web Title: corruption police recruitment exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस