बायोटॉयलेटचा खर्च वाढला

By admin | Published: January 28, 2016 03:03 AM2016-01-28T03:03:57+5:302016-01-28T03:03:57+5:30

बायो टॉयलेटचा वापर मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास नादुरुस्त होण्याचा धोका असल्याने तूर्तास हा प्रकल्प मुंबईत न राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला

The cost of biotoylate increased | बायोटॉयलेटचा खर्च वाढला

बायोटॉयलेटचा खर्च वाढला

Next

मुंबई: बायो टॉयलेटचा वापर मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास नादुरुस्त होण्याचा धोका असल्याने तूर्तास
हा प्रकल्प मुंबईत न राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे़ त्याऐवजी पाच हजार
पारंपरिक शौचालये बांधण्यात येणार आहेत़
पालिकेने मुंबईत सात हजार ५६० सार्वजनिक शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला़ यापैकी दोन हजार २६० बायोटॉयलेट बांधण्यात येणार होते़ प्रत्येक शौचकुपीसाठी पालिकेने दीड लाख रुपये खर्च निश्चित केला होता़ प्रत्यक्षात दुप्पट व तीन पट दरात ठेकेदाराने काम करण्याची तयारी दाखविली़ मात्र क्षमतेपेक्षा
जास्त वापर झाल्यास या शौचकुपींमध्ये बिघाड होण्याचा धोका आहे़
त्यामुळे पालिकेने तूर्तास मुंबईत बायोटॉयलेट न बांधण्याचा निर्णय घेतला आहे़ त्याऐवजी आता पुन्हा पारंपरिक शौचालय बांधण्यात येणार आहेत़ याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज मंजुरी दिल्यामुळे असे पाच हजारांहून अधिक शौचालये बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ (प्रतिनिधी)

पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत ११७ ठिकाणी उघड्यावर शौच केले जाते़ अशा ठिकाणीच प्रामुख्याने शौचालये बांधण्यात येणार आहेत़ यासाठी प्रत्येक वॉर्डातील सहाय्यक आयुक्त जागेचा शोध घेत आहेत़

केंद्र आणि राज्य सरकारच्या भूखंडांवर यापूर्वी शौचालये बांधण्यासाठी पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत होते़ मात्र स्वच्छ भारत अभियानयातील तरतुदीमुळे आता अशाप्रकारच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज भासणार नाही़ त्यामुळे शौचालये बांधण्याचे काम वेगाने होईल, असे अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले़

आत्तापर्यंत एक शौचकुपे५० माणसे वापरतील, असा नियम होता़ मात्र यापुढे ३५ पुरुष आणि २५ स्त्रिया एक शौचकूप वापरतील, या हिशोबाने शौचालये बांधण्यात येणार आहेत़

Web Title: The cost of biotoylate increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.