मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते पुन्हा एकदा खड्डयात गेले आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी छोटे-मोठे काम करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरूस्ती पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. १३४ मोठ्या व किरकोळ दुरूस्त्यांसाठी तब्बल अडीशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
यावर्षीच्या पावसानेही मुंबईच्या रस्त्यांची दैंना केली आहे. रस्त्यांच्या छोट्या-मोठ्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. कफ परेड, नरीमन पाँईंट, दादर येथील महत्वाच्या रस्त्यांचा यात समावेश आहे. विविध सेवा कंपन्यांना वारंवार रस्ता खोदावा लागू नये, यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी रस्त्याच्या एका बाजुलाच केबल्स टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. रस्त्यांची कामे करण्यासाठी महापालिकेने ठेकेदारांच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
या रस्त्यांची दुरुस्तीगिरगाव-राजा राम मनमोहन रॉय, सेनापती बापट मार्ग, प्रतिक्षा नगर वाचनालय रोड-सायन, बरकत अली दर्गा रोड, गणेश गल्ली रोड, दोस्ती एकर रोड-वडाळा, शिवडी क्रॉस रोड, दिनशॉ पेटीट रोड, सुबानराव नलावडे रोड-परळ, परमार गुरूजी रोड, महालक्ष्मी मंदिर रोड, सोफिया कॉलेज लेन-पेडर रोड, गावदेवी रोड-ताडदेव, नानू भाई देसाई रोड-गिरगाव.