भुयारी मार्गाचा खर्च २० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 12:59 AM2019-03-09T00:59:42+5:302019-03-09T00:59:48+5:30
सात वर्षांपासून रुंदीकरणाचे काम रखडलेल्या जोगेश्वरी (पूर्व) येथील जनता कॉलनी (संजय गांधी) भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या मार्गातील अडथळे आता दूर झाले आहेत.
मुंबई : सात वर्षांपासून रुंदीकरणाचे काम रखडलेल्या जोगेश्वरी (पूर्व) येथील जनता कॉलनी (संजय गांधी) भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या मार्गातील अडथळे आता दूर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला आहे. १८ महिन्यांमध्ये याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी २० कोटी ६० लाख खर्च करण्यात येणार आहे.
जोेगेश्वरी (पूर्व) येथील लोकसंख्येत वाढ झाल्याने वाहतुकीच्या कोंडीत वाढ झाली होती. स्थानिक आमदार व राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी २०१२ साली प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम यांना विभागाला सादर केला. अडथळे दूर झाल्यानंतर २०१७ मध्ये एमएमआरडीएकडे हा प्रस्ताव हस्तांतरित केला. ६ डिसेंबर, २०१८ रोजी एमएमआरडीएने या कामाचे टेंडर मंजूर केले. टेंडर प्रक्रियेनंतर एन. ए. कनस्ट्रक्शन या कंपनीला या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांना हे काम १८ महिन्यांमध्ये पूर्ण करावे लागणार आहे. सुमारे २० कोटी ६० लाख इतक्या रकमेचे कंत्राट देण्यात आले आहे. भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असून, रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत भुयारी मार्गाचे काम करण्याची परवानगी वाहतूक विभागाने दिली आहे.
>रहिवाशांना दिलासा देण्यासाठी स्थानिक आमदार व राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी २०१२ साली संजय गांधी भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम यांना विभागाला सादर केला. अडथळे दूर झाल्यानंतर १३ एप्रिल, २०१७ रोजी विकास प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव हस्तांतरित करण्यात आला.
>पश्चिम द्रुतगती मार्गावरील जनता
कॉलनी (संजय गांधी) चे रुंदीकरण
सद्यस्थिती लांबी, सुधारित लांबी,
रुंदी रुंदी
२० मीटर लांबी ४० मीटर लांबी
९ मीटर रुंदी २० मीटर रुंदी
४.५ मीटर उंची ५.५ मीटर उंची