कोरोनामुळे कापूस व्यापाराला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 02:35 AM2020-02-18T02:35:06+5:302020-02-18T02:35:37+5:30

कापसाची निर्यात थांबली; भाव पडल्याने शेतकरीही आले अडचणीत

The cotton trade caused a major blow to Corona | कोरोनामुळे कापूस व्यापाराला मोठा फटका

कोरोनामुळे कापूस व्यापाराला मोठा फटका

googlenewsNext

आनंद इंगोले 

वर्धा : कापसाच्या गाठी खरेदी करणारा चीन हा सर्वात मोठा देश असून भारतातील कापसाच्या गाठी चीनमध्ये निर्यात केल्या जातात. महिन्याभरापासून चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने कापसाच्या गाठीची निर्यात थांबली आहे. त्याचा कापूस व्यापारावर परिणाम होऊन कापसाचे दरही गडगडले आहे.

कापसाला शासनाकडून ५ हजार ५५० रुपये हमीभाव देण्यात आला. मात्र, चीनमध्ये कापसाच्या गाठींची मोठी मागणी असल्याने कापसाचे दर सहा हजार पार करण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे व्यापाऱ्यांसह शासनानेही कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. कापसाच्या गाठी तयार असताना कोरोनामुळे चीनमध्ये होणारी निर्यात थांबली आहे.
कापसाच्या दरावर सरकीमुळे परिणाम झाला आहे. ४ हजार रुपये क्विंटल ढेप असताना साडेतीन हजार रुपये क्विंटल सरकी विकली जात होती. मात्र, आता २ हजार रुपयांपुढे भाव सरकत नसल्याचे चित्र आहे. जागतिक बाजारपेठेत मका स्वस्त झाल्याने ढेप स्वस्त झाली परिणामी सरकी आणि कापसाचेही भाव गडगडले आहे. शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर कोरोनाच्या आड टेक्सटाईल्स कंपन्या मालामाल होण्याची शक्यता आहे, असे शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांनी सांगितले.

कापूस उत्पादकांची ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांना सबसिडी
द्यावी. एक हजार रुपये बोनस देऊन शेवटच्या बोंडापर्यंत हमीभावात कापूस खरेदी करण्याची व्यवस्था करावी. सर्व कापूस सीसीआय व नाफेडच्या माध्यमातून खरेदी करावा.
- विजय जावंधिया,
शेतकरी संघटनेचे पाईक

अमेरिकेत तूप, खोबरे पाठविणे बंद

औषधांवरही निर्बंध; भारतीय विद्यार्थ्यांना फटका

संजय पाठक 

नाशिक : कोरोनामुळे अमेरिकेच्या परराष्टÑ मंत्रालयाने तेथील स्थानिक भारतीयांसाठी औषधे आल्यास त्यासाठी अनेक निर्बंध घातले आहेत. तर दुसरीकडे तूप, खोबरे आणि लोणचे घेण्यास जवळजवळ मनाईच केली आहे. त्याचा भारतीय विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.
विद्यार्थी तसेच नोकरी करणाºया तरूणांना त्यांचे पालक अनेक गरजेच्या वस्तू पाठवत असतात. कोरोनामुळे परिस्थिती अडचणीची झाली आहे. अमेरिकेने सूचनापत्र जारी केले असून त्यानुसार तूप नेण्यास बंदी आहेच. शिवाय खोबरे टाकलेली चटणीदेखील पाठविण्यास मनाई आहे. तसेच आता कोणतेही औषध पाठविताना त्याबरोबर भारतीय डॉक्टरांचे प्रिस्किप्शन आणि औषधे ज्या विक्रेत्याकडून खरेदी केली, तेथील कॉम्प्युटराईज्ड पावती द्यावी लागते. प्रत्येक औषधाची माहिती एक्स्केल शीट भरून द्यावे लागते. त्यात औषधाचे प्रमाण, रोज घ्यायची मात्रा, त्याचे प्रमाण, उत्पादनाची तारीख, मुदत संपण्याचा कालावधी अशा अनेक प्रकारची माहिती भरावी लागते. ही सर्व माहिती दिल्याशिवाय औषधेदेखील स्वीकारली जात नाही. याशिवाय कोणतीही औषधे ही तीन महिन्यांच्या आत संपतील अशा कालावधीपुरती असेल तरच ती स्वीकारली जातात.
 

Web Title: The cotton trade caused a major blow to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.