Join us  

एकटे कफ परेड मतदानात फेल!

By admin | Published: February 23, 2017 6:46 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदानात मुंबईतील तब्बल ५२ प्रभागांत ६० टक्क्यांहून

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदानात मुंबईतील तब्बल ५२ प्रभागांत ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. याउलट एकट्या कफ परेडमधील प्रभाग क्रमांक २२७ मध्ये सर्वात कमी म्हणजे २८.२५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे महापालिकेत ५० हून अधिक प्रभागांत फर्स्ट क्लास मतदान झाले असताना, केवळ एक प्रभाग मतदानात फेल झाल्याची चर्चा आहे.मुंबई एकूण सरासरी ५५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे प्रभाग क्रमांक २२७ चा अपवाद वगळता एकाही प्रभागात ४० टक्क्यांहून कमी मतदान झालेले नाही. तर २२१, २२४ आणि १०२ या केवळ तीन प्रभागांत ४५ टक्क्यांहून कमी मतदान झाले आहे. त्यामुळे या प्रभागांत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोगाला गंभीर दखल घ्यावी लागणार आहे. शिवाय येथील मतदार मोठ्या संख्येने मतदान करतील, यासंदर्भात विशेष योजना आखावी लागेल.याआधी निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत कमी मतदान झालेल्या विभागांची यादी केली होती. संबंधित विभागात महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट आणि शासकीय व निमशासकीय कार्यालयांद्वारे जोरदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. त्यात मतदार यादीतून स्युमोटो घेऊन नावे वगळल्यानंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत मुंबईत रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाली होती. मात्र यंदा आयोग याबाबत कमी पडल्याचे चित्र आहे. कारण गतवेळच्या महापालिका निवडणुकांहून यंदा अधिक मतदान झाल्याचे दिसत असले, तरीही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकांत कमी मतदान झालेल्या प्रभागांत आयोगाला विशेष खबरदारी बाळगावी लागणार आहे. (प्रतिनिधी)मतदानातील काही मजेशीर आकडेवारी...५२ प्रभागांत फर्स्ट क्लास मतदान झाले.१४१ प्रभागांत ४५ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे.३ प्रभागांत ३५ ते ४५ टक्के मतदान झाले.एकाच प्रभागात ३५ टक्क्यांहून कमी मतदान झाले.४५ टक्क्यांहून अधिक मतदान झालेल्या १४१ प्रभागांमधील एकूण १२८ प्रभागांत मुंबईतील सरासरी मतदानाहून अधिक मतदान झाले आहे.९९ प्रभागांत मुंबईच्या सरासरी मतदानाहून कमी मतदानाची नोंद झालेली आहे.