कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्रकल्प राबवणार नाही, एसआरए प्राधिकरणाने दिली ग्वाही

By मनोहर कुंभेजकर | Published: March 16, 2023 06:11 PM2023-03-16T18:11:05+5:302023-03-16T18:11:15+5:30

कफपरेड येथील मच्छिमार नगर कोळीवाडा म्हणून घोषित असताना तसेच ज्या भूखंड क्रमांक १३९ ते १४४ वर हा कोळीवाडा स्थित आहे.

Coughparade will not implement SRA project in Koliwada, SRA authority assured | कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्रकल्प राबवणार नाही, एसआरए प्राधिकरणाने दिली ग्वाही

कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्रकल्प राबवणार नाही, एसआरए प्राधिकरणाने दिली ग्वाही

googlenewsNext

मुंबई - कफपरेड येथील मच्छिमार नगर कोळीवाडा म्हणून घोषित असताना तसेच ज्या भूखंड क्रमांक १३९ ते १४४ वर हा कोळीवाडा स्थित आहे. सदर जमीन महसूल विभागाची असताना झोपडपट्टी विकास प्राधिकरण यांनी या भूखंडाना स्वतःच्या क्लस्टर क्रमांक अ-००७  अशी नोंदणी क्रमांक देऊन ड्रोन द्वारे सर्वेक्षण आणि नंतर घरा-घरात जाऊन मोजणी करण्याचा काम हे असंविधानिक, अनैतिक आणि कायद्याला धरून नसल्याचे गंभीर आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी केला होता. 

एसआरएने केलेली नोंदणी ही बेकायदेशीर असल्याने अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीकडून आक्षेप घेण्यात आला होता. मच्छिमार समितीने आक्रमक पवित्रा घेत एसआरए या कोळीवाड्यांमध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप  तांडेल यांनी केला होता.

एसआरए प्राधिकरणाच्या अश्या बेकायदेशीर कार्यवाहीच्या विरोधात मच्छिमार समितीकडून प्राधिकरणाला आक्षेप नोंदविण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात लेखी तक्रार तांडेल यांनी केली होती.

 कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्राधिकरणाकडून झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू करण्याच्या तयारीत असल्यामुळे मच्छिमार रहिवाश्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण पसरले होते. याबाबत लोकमत ऑन लाईन मध्ये दि,३ मार्च आणि लोकमतमध्ये दि,४ मार्च रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.

एसआरए प्राधिकरणाने दिनांक १४/०३/२०२३ रोजी सक्षम प्राधिकारी - १ चे वरिष्ठ अधिकारी विश्वास गुजर यांनी स्पष्टीकरण देत खुलासा केला की,सदर कोळीवाडा म्हणून घोषित असलेल्या जमिनीवर सद्यस्थितीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना न राबविण्याबाबत विधानमंडळात चर्चा झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील कुलाबा महसूल विभागातील बी.बी.आर प्लॉट क्रमांक १३९, १४०, १४१, १४२ व १४३ या मिळकतीवर कोणतीही झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याबाबत प्रस्ताव एसआरए कार्यालयाकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सदर ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.एसआरए प्राधिकरणाला झुकते माप घ्यावे लागले अशी माहिती तांडेल यांनी दिली.

तसेच बी.बी.आर प्लॉट क्रमांक १४४ लगतच्या मिळकतीवर महात्मा ज्योतिबा फुले सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित या संस्थेची झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल असून सदर मिळकतीवरील अंदाजे १०० झोपड्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण मागील दोन महिन्यात झाले आहे. सदर संस्थेच्या मिळकतीची मोजणी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, मुंबई शहर जिल्हा यांचे मार्फत करण्यात येणार असून त्यानंतर सदर संस्थेच्या काही (२ ते ३) झोपड्या प्लॉट क्रमांक १४४ वर येत आहेत अगर कसे याबाबत निश्चित होईल असे पत्रात नमूद केले आहे.

एसआरएचे सक्षम प्राधिकरण १ च्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मच्छिमार समितीकडून स्वागत करण्यात आले आहे. आता मच्छिमार एसआरए प्राधिकरणातील जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख अधिकारी निर्भवणे यांच्या भूमिकेवर नजर राखून आहेत. जर जिल्हा अधीक्षकांनी कफपरेड कोळीवाड्याला क्लस्टर अ-००७ मधून वगळले नाही तर समिती प्राधिकरण विरोधात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार असल्याची माहिती तांडेल यांनी दिली.

लोकमतचे मानले आभार

 हा मुद्दा लोकमतने उचलून धरल्यामुळे मच्छिमारांवर होऊ घातलेल्या अन्यायाचा वाचा फुटली.त्यामुळे सदर ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
असे अखेर एसआरएने मान्य केले.

Web Title: Coughparade will not implement SRA project in Koliwada, SRA authority assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.