Join us

धोरण नसताना पार्किंगवरील कारवाईवर नगरसेवक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 1:04 AM

नगरसेवक अश्रफ आजमी यांनी पार्किंगच्या मुद्द्यावरून पालिका महासभेत गुरूवारी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.

मुंबई : अनधिकृत पार्किंगवर दंड करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. या निर्णयाला सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत तत्वत: मंजुरी देण्यात आली. मात्र पार्किंगची योजना बनवून याबाबतचा प्रस्ताव पालिका महासभेत आणणे अपेक्षित होते. ही परवानगी न घेतल्यामुळे पार्किंगवरील कारवाईच अनधिकृत ठरते असे नगरसेवकांनी महासभेच्या निदर्शनास आणले.

नगरसेवक अश्रफ आजमी यांनी पार्किंगच्या मुद्द्यावरून पालिका महासभेत गुरूवारी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. पालिका प्रशासनाने या सभागृहाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी देखील पार्किंगसाठी योजना न बनविल्याबद्दल नाराजी व्यकत केली. वाहन चालक आणि मुंबईकर पालिकेच्या धोरणांवर नाराज आहेत. त्यामुळे या योजनेचा फेरविचार करावा, असे मत त्यांनी मांडले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका