न्यायालयाच्या निर्णयानंतर नितीन सलाग्रे यांच्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:58 AM2019-11-09T01:58:52+5:302019-11-09T01:58:56+5:30

७६ हा प्रभाग इतर मागासवर्गीय म्हणून राखीव होता. प्रभागाच्या नगरसेविका

Councilor Nitin Salagre's throat after the court's decision | न्यायालयाच्या निर्णयानंतर नितीन सलाग्रे यांच्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ

न्यायालयाच्या निर्णयानंतर नितीन सलाग्रे यांच्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ

Next

मनोहर कुंभेजकर 

मुंबई : लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधीश स्वर्णिता बा. महाले यांनी शुक्रवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नितीन बंडोपंत सलाग्रे यांना प्रभाग क्रमांक ७६ चे नगरसेवक म्हणून घोषित केले. महापालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सलाग्रे यांच्या नगरसेवकपदाची घोषणा करणार आहेत.

७६ हा प्रभाग इतर मागासवर्गीय म्हणून राखीव होता. प्रभागाच्या नगरसेविका म्हणून फेब्रुवारी २०१७ ला केशरबेन मुरजी पटेल या निवडून आल्या होत्या. त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यापूर्वी फेटाळले होते. या जात पडताळणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात केशरबेन मुरजी पटेल यांनी आव्हान दिले होते. न्यायालयात दिलेले आव्हान संपुष्टात आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ५ एप्रिल २०१९ रोजी केशरबेन मुरजी पटेल यांना नगरसेवक म्हणून बाद ठरविले. त्यानंतर या प्रभागात कोणीही नगरसेवक नव्हते. आता नितीन सलाग्रे यांच्या नगरसेवकपदामुळे काँग्रेसचे पालिकेतील संख्याबळ वाढणार आहे.

Web Title: Councilor Nitin Salagre's throat after the court's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.