नगरसेविकेचे पद धोक्यात
By admin | Published: June 12, 2015 05:54 AM2015-06-12T05:54:02+5:302015-06-12T05:54:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग ६ मधील नगरसेविका संगीता राजबली यादव यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. त्यांनी सादर केलेले जात
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग ६ मधील नगरसेविका संगीता राजबली यादव यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे मुंबई शहर उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून संगीता यादव यांचे नगरसेवकपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आरक्षित प्रभागांमधून निवडणूक लढविलेल्या अनेक नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्रांवर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. जात प्रमाणपत्र बोगस असून संबंधितांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली . आक्षेप घेतलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. प्रभाग ६ या ओबीसी प्रभागातून राष्ट्रवादीच्या संगीता यादव निवडून आल्या आहेत. त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राविषयी दुर्गाविजय रामनाथ पाल यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती. त्यांना मुंबई जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालयातून धक्कादायक माहिती प्राप्त
झाली आहे. यादव यांनी सादर
केलेला दाखला त्यांच्या कार्यालयातून दिलाच गेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई शहरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांनाही याविषयी पत्र दिले आहे. यादव यांना सेतू कार्यालयातून जे जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे ते सदर कार्यालयातून देण्यात आलेले नाही. जात प्रमाणपत्रावर असलेली
स्वाक्षरी व गोल शिक्काही बोगस असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे यादव यांचे नगरसेवकपद धोक्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका आयुक्त व निवडणूक विभाग याविषयी काय भूमिका
घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)