अभ्यासाइतकीच उत्तरपत्रिका महत्त्वाची, समुपदेशकांंचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:59 PM2020-03-02T23:59:09+5:302020-03-02T23:59:14+5:30

आजपासून दहावीच्या परीक्षांचा श्रीगणेशा होत आहे. खरे तर टेन्शननेच अर्ध्या झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वेळेपर्यंत मग उत्तरपत्रिकेतील लिखाणाविषयी सल्ले दिले जातात,

Counselor's answer sheet is important, opinion of counselors | अभ्यासाइतकीच उत्तरपत्रिका महत्त्वाची, समुपदेशकांंचे मत

अभ्यासाइतकीच उत्तरपत्रिका महत्त्वाची, समुपदेशकांंचे मत

Next

मुंबई : आजपासून दहावीच्या परीक्षांचा श्रीगणेशा होत आहे. खरे तर टेन्शननेच अर्ध्या झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वेळेपर्यंत मग उत्तरपत्रिकेतील लिखाणाविषयी सल्ले दिले जातात, पण अभ्यासाइतकीच उत्तरपत्रिका महत्त्वाची असल्याचे मत समुपदेशकांनी व्यक्त केले आहे, तसेच उत्तरपत्रिका लिहिताना कोणत्या मुद्द्यांचा समावेश कसा? कितपत असावा ? कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे, या गोष्टींचा ऊहापोह समुपदेशकांनी परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी केला आहे.
परीक्षेत उत्तरे चांगली लिहिण्याबरोबरच ती नेटकी मांडणेही तितकेच आवश्यक आहे. उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसली, तर ती नक्कीच वाखाणली जाते, म्हणूनच अभ्यासपूर्ण आणि तितकीच सुंदर उत्तरपत्रिका लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा. उत्तरपत्रिकेमध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना या प्रश्नाचा योग्य क्रमांक स्पष्टपणे टाकणे महत्त्वाचे असते.
पेपर वेळेत पूर्ण करण्याची धांदल म्हणा किंवा परीक्षेमुळे आलेला तणाव म्हणा, त्यामुळे अनेकदा गडबडीत विद्यार्थी प्रश्नाचा क्रमांक चुकीचा लिहितात. अशा वेळी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या व्यक्तीचाही गोंधळ उडतो आणि उत्तर बरोबर असूनही, केवळ प्रश्नाचा क्रमांक चुकल्याने विद्यार्थ्याला मार्क गमवावे लागतात, असे समुपदेशकांनी सांगितले.
सहा ते आठ मार्क असलेल्या प्रश्नांची उत्तरे विस्तारपूर्वक असणे अपेक्षित असते. त्यामध्ये विषयाशी निगडित परिभाषा इत्यादी समाविष्ट कराव्यात. नंतरच्या मुद्द्यांमध्ये विषयाशी निगडित थियरी, नियम इत्यादींचा समावेश असावा. आवश्यक त्या ठिकाणी उदाहरणे समाविष्ट केली जावीत.
परीक्षकांच्या दृष्टीने शब्दमर्यादा पाळली जाणे महत्त्वाचे ठरते, तसेच या उत्तरांमध्ये आवश्यक ग्राफ, डायग्राम, फॉर्म्युला याचा अवश्य समावेश असावा, असे मत समुपदेशकांनी व्यक्त केले.
>वारंवार खाडाखोड करणे टाळा
उत्तरपत्रिका लिहिताना त्यामध्ये वारंवार खाडाखोड करणे टाळावे, तसेच उत्तर लिहिताना एखादी चूक झालीच, तर त्यासाठी उत्तरपत्रिकेच्या संपूर्ण पानावर खाडाखोड टाळावी. एखाद्या प्रश्नाचे उत्तर एकत्र, एकाच वेळी लिहून संपवावे. थोडे उत्तर एका पानावर, त्या उत्तराशी निगडित मुद्दा इतरत्र कुठेतरी अशाप्रकारे उत्तरे लिहिणे टाळावे.
प्रश्नपत्रिका बहुधा चार विभागांत विभागलेली असते. त्यापैकी कोणताही विभाग आधी सोडविला जाणे स्वीकार्य असले, तरी एका वेळी तो
विभाग संपूर्ण सोडवून संपवावा आणि मगच दुसºया विभागातील प्रश्न सोडविण्यास सुरुवात करावी. तसे न केल्यास उत्तरपत्रिका तपासणाºयाचा गोंधळ उडू शकतो.
परिणामी, विद्यार्थ्याचे गुण कापले जाण्याची शक्यता जास्त असते, असे समुपदेशकांनी सांगितले.

Web Title: Counselor's answer sheet is important, opinion of counselors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.