Join us

मेट्रोत खेपेमागे मोजा पैसे

By admin | Published: August 01, 2014 2:53 AM

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवीन शक्कल लढवल्या जात आहेत.

मुंबई : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवीन शक्कल लढवल्या जात आहेत. वायफाय, स्मार्ट कार्ड सेवा देतानाच आता ट्रिपमागे (खेप) पैसे मोजण्याची नवीन शक्कल मेट्रोकडून लढवण्यात आली आहे. ४५ ट्रिपसाठी ६०० रुपये आकारण्यात येणार असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले. ८ जूनपासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर महिनाभर दहा रुपये भाडे आकारणी करण्यात आली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ८ जुलैपासून नवीन भाडे मेट्रोकडून आकारण्यात आले. यात स्मार्ट कार्डद्वारे प्रवासात सूट मिळाल्यानंतर प्रवाशांनी त्याचा अधिक लाभ घेतला. प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आता नवीन पास सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. ४५ ट्रिपसाठी ६०० रुपये आणि ६० ट्रीपमागे ८०० रुपये आकारण्यात येणार आहेत. १ आॅगस्टपासून ही सेवा देतानाच सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंत राहील. तसेच सुधारित पासही मिळेल. (प्रतिनिधी)