Join us

शहर जिल्ह्यात तीन हजार कर्मचारी करणार मतमोजणीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:12 AM

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे ...

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी शिवडी येथील न्यू शिवडी वेअर हाउस, गाडी अड्डाजवळ, एम. एस. रोड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, शिवडी (पूर्व) येथे होणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सुसज्ज आहे असून, मतमोजणीच्या कामासाठी सुमारे तीन हजार कर्मचारी-अधिकारी नेमण्यात आले असून, त्यांच्यामार्फत पारदर्शी आणि अचूकतेने मतमोजणी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी व्यक्त केला.

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ विधानसभा मतदार संघ निहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रत्येकी विधानसभा निहाय १४ टेबल असणार आहेत. त्यानुसार, लोकसभा मतदार संघाच्या फेºया होणार आहेत. या मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. सर्व विधानसभा मतदार संघातील ८४ टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसºया फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. सर्वप्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सीस्टिम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत, तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.मर्यादित प्रवेश : शिवडीत कडक पोलीस बंदोबस्त असून, मतमोजणीच्या दिवशी अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या, तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन करावयाचे आहे, असे आदेश देण्यात आले आहेत.केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती : मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाºया दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीकरिता केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.