- सचिन लुंगसेमुंबई : देशभरात सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत १० टक्के अधिक मान्सूनची नोंद होऊनही देशभरातील २५ टक्के भाग अद्यापही दुष्काळाच्या झळा सोसत आहे. यामध्ये पूर्वोत्तर भारतातील काही राज्ये, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भाचा समावेश आहे. गेल्या १९ वर्षांत अठराव्यांदा पूर्वोत्तर राज्यांत सामान्य मान्सूनच्या तुलनेत कमी मान्सूनची नोंद झाली असून, मुंबईचा विचार करता मान्सूनच्या २०१९ सालच्या नोंदीनुसार, आतापर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत तब्बल पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे.जागतिक तापमानवाढ हे अतिवृष्टीमागचे मुख्य कारण असून, दरवर्षी अशा घटनांमध्ये वाढ होत राहील, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या वर्षीच्या मान्सूनची नोंद ११० टक्के असून, १० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनने या वर्षी अनेक विक्रम मोडीत काढले असून, २५ वर्षांनंतर प्रथमत: मान्सूनने या हंगामात १० टक्क्यांपेक्षा अधिक नोंद केली आहे. यापूर्वी १९९४ साली अशी स्थिती निर्माण झाली होती. आणि १९३१ नंतर पहिल्यांदा असे झाले आहे की जूनमध्ये पडलेल्या कमी पावसानंतर संपूर्ण मान्सून हंगामात १० टक्के अधिक नोंद झाली आहे. मान्सूनच्या सुरुवातीला ‘वायू’ चक्रिवादळामुळे पाऊस विलंबाने दाखल झाला होता. जूनमध्ये सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत ३० टक्के अधिक पाऊस पडला होता. या वर्षी ८८ सेमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद मध्य आणि दक्षिण भारतात झाली आहे. मध्य भारतात सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत २९ टक्के अधिक तर दक्षिण भारतात १६ टक्के अधिकचा पाऊस झाला. मात्र एवढे असूनही काही परिसर असेही आहेत; जेथे आजही पाण्याची कमतरता आहे. आसाम आणि बंगालमध्ये पूर आला असतानाही पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत १२ टक्के कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.जागतिक तापमानवाढ कारणीभूतमुंबईत पावसाने जून, जुलै आणि सप्टेंबरची सरासरी सहज पार केली आहे. तर आॅगस्ट महिन्यात पाऊस बरोबरीत राहिला. मुंबईत मान्सूनच्या हंगामात सर्वाधिक वेळेस तीन अंकी पाऊस होण्याची नोंद या वर्षी झाली आहे. एवढा मोठा पाऊस होण्यास जागतिक तापमानवाढ, हवामान बदल कारणीभूत आहे.३५७ जिल्ह्यांतील २५ लाख नागरिकांना बसला आपत्कालीन घटनांचा फटकाभारतीय उपखंडातील भौगोलिक परिस्थितीत झालेले बदल, जागतिक तापमानवाढ हे घटक अतिवृष्टीस कारणीभूत ठरली.या वर्षी बिहार, आसाम, महाराष्ट्र, पूर्व उत्तर प्रदेश, कर्नाटकआणि केरळसह देशभरातील अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.गृहमंत्रालयाच्या आकड्यानुसार, या वर्षी २२ राज्यांतील ३५७ जिल्ह्यांतील २५ लाख नागरिक पूर, पाऊस आणि जमीन खचणे यांसारख्या आपत्कालीन घटनांनी प्रभावित झाले.च्असून, ३ लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले; तर १४.१४ लाख हेक्टरवरील शेतीची हानी झाली.
देशात ११० टक्के पाऊस पडूनही २५ टक्के भागात दुष्काळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 1:49 AM