सावरकरांच्या टीकाकारांना देश माफ करणार नाही

By admin | Published: April 22, 2017 01:55 AM2017-04-22T01:55:40+5:302017-04-22T01:55:40+5:30

राष्ट्रभक्तांची निंदा करणे चुकीचे आहे. सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेणाऱ्या, त्यांच्यावर सदोदित टीका करणाऱ्या काँग्रेसला देश माफ करणार नाही, असा टोला भाजपाचे राष्ट्रीय

The country will not forgive Savarkar's commentators | सावरकरांच्या टीकाकारांना देश माफ करणार नाही

सावरकरांच्या टीकाकारांना देश माफ करणार नाही

Next

ठाणे : राष्ट्रभक्तांची निंदा करणे चुकीचे आहे. सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेणाऱ्या, त्यांच्यावर सदोदित टीका करणाऱ्या काँग्रेसला देश माफ करणार नाही, असा टोला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी लगावला.
ठाण्यात आयोजित २९व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान व वि. दा. सावरकर प्रतिष्ठानने हे संमेलन आयोजित केले आहे. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवत शाह यांनी ते कसे राष्ट्रभक्त होते, याची उदाहरणे दिली. ज्या देशभक्ताने अंदमानसारख्या तुरुंगात राहून आपल्या रक्ताने सहा हजार शब्दांची कविता लिहिली, त्यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणे म्हणजे हा त्यांच्या देशभक्तीचा अवमानच ठरेल, असे ते म्हणाले. सावरकरांनी शिवरायांवर उत्तम लिखाण केले. अनेक नवे प्रतिशब्द तयार करून त्यांनी भाषाशास्त्रावरील प्रभाव दाखवून दिला. अंदमानच्या जेलमध्ये जी देशभक्तीची ज्योत भाजपाने तेवत ठेवली होती, ती विझवण्याचे काम काँग्रेसने केले. परंतु भाजपाची सत्ता आल्यानंतर ज्योत पुन्हा तेवती ठेवल्याचे सांगत ती सैदव तेवत राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
हे साहित्य संमेलन संपूर्ण देशात न्यावे, तसे ते नेल्यास जाज्ज्वल्य इतिहास जपणारी नवीन पिढी निर्माण होईल, असा विश्वास शाह यांनी या वेळी व्यक्त केला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आशय असणारी, सामाजिक न्यायाचा आग्रह धरणारी राज्यघटना देशाला दिली. देशात इतर विचारधारणा अस्ताला जात असताना सावरकर-आंबेडकर हाच देशाच्या विचारांचा पुढचा प्रवास आहे, असे मत संमेलनाचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी मांडले. (प्रतिनिधी)

सावरकरांना भारतरत्न द्या!
सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केली. ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलून धरली. स्वा. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी अमित शाह यांनी पूर्ण करावी, असा आग्रह शिंदे यांनी धरला.

- राष्ट्रभक्ती हा दहावा रस साहित्यात जोडण्याचे काम सावरकर यांनी केले, अशा राष्ट्रभक्तावर बोलण्याचा अधिकार काँग्रेसला नसल्याचे खडे बोल शाह यांनी सुनावले.

Web Title: The country will not forgive Savarkar's commentators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.