वर्सोव्याच्या समुद्रात जोडपे बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 08:52 PM2018-06-20T20:52:21+5:302018-06-20T20:52:21+5:30
र्सोव्यात समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेले एक जोडपे त्यात बुडाले.
मुंबई: वर्सोव्यात समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेले एक जोडपे त्यात बुडाले. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला. या दोघांचेही मृतदेह जुहू आणि वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर सापडले असुन याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिफा आणि फजल अशी या दोघांची नावे आहेत. जे साकिनाका परिसरातील राहणारे होते. जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी हे दोघे मित्र मैत्रिण वर्सोवा बीच फिरायला आले होते. मात्र नंतर ते अचानक तिथुन गायब झाले. काही वेळाने मुलाचा मृतदेह जुहू बीचवर सापडला. त्याच्याकडे सापडलेल्या काही कागदपत्रावरून त्याचे नाव फजल असल्याचे पोलिसांना समजले. तर संध्याकाळी सिफाचा मृतदेह वर्सोवा बीचवर सापडला. 'वर्सोवा किनाऱ्यावर बसले असताना त्यांना कदाचित भरतीचा अंदाज आला नसावा. ज्यात हे दोघे बुडाले असावे असा प्राथमिक अंदाज जुहू पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला. त्यांच्या नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले असुन सध्या याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचेही त्यांनी सांगितले. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले. या दोघांनी आत्महत्या केली का , अशीही चर्चा आहे. अद्याप यात कोणत्याही प्रकारची संशयीत बाब आढळ लेली नसून आम्ही सर्व अनुषंगाने तपास करत आहोत, असेही त्यांनी नमुद केले.