Join us  

मुलगी विकणाऱ्या जोडप्यास सात वर्षांची शिक्षा

By admin | Published: February 04, 2015 2:30 AM

वेश्याव्यवसायात येण्यापासून रोखले़ त्यांच्या या सतर्कतेमुळे त्या मुलीला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जोडप्याला सात वर्षांची शिक्षाही झाली़

मुंबई : फसवणूक करून आपल्याला वेश्याव्यवसायात ढकले गेले़ पण इतर कोणत्या मुलीची अशी अवस्था होऊ नये, या विचाराने कामाठीपुरा येथे दोन वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी एका मुलीला वेश्याव्यवसायात येण्यापासून रोखले़ त्यांच्या या सतर्कतेमुळे त्या मुलीला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जोडप्याला सात वर्षांची शिक्षाही झाली़ मंगळवारी विशेष न्यायाधीश ए़ एस़ शेंडे यांनी सबाहुद्दीन खान व त्याची पत्नी रबीयाला सात वर्षांची शिक्षा ठोठावली़ हे दोघे गेल्यावर्षी बिहारहून एका १९ वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला घेऊन आले़ येथे आणल्यानंतर ते तरुणीला कामाठीपुरात घेऊन गेले़ तेथे दोन वेश्यांना ते भेटले़ आम्ही एका मुलीला घेऊन आलोत आहोत़ तिच्यासाठी किमान चाळीस हजार रुपयांचा एक ग्राहक बघा़ आम्ही तुम्हाला कमिशन देऊ, असे या जोडप्याने त्या दोन महिलांना सांगितले़मात्र त्या दोन महिलांनी या मुलीला वाचवण्याचा विचार केला व तत्काळ पोलिसांना बोलावले़ पोलिसांनी या जोडप्याला अटक केली़ हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील कल्पना हिरे यांनी त्या महिलांसह आठ जणांची साक्ष नोंदवली़ (प्रतिनिधी)