‘न्यायालयाचा गौरव राखा!’ काँग्रेसचे अभियान

By admin | Published: May 10, 2017 02:42 AM2017-05-10T02:42:42+5:302017-05-10T02:42:42+5:30

भारतीय न्यायव्यवस्थेचे महत्व अधोरेखित करताना संवैधानिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधी विभागाने

'Courage of the Court!' Congress campaign | ‘न्यायालयाचा गौरव राखा!’ काँग्रेसचे अभियान

‘न्यायालयाचा गौरव राखा!’ काँग्रेसचे अभियान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय न्यायव्यवस्थेचे महत्व अधोरेखित करताना संवैधानिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधी विभागाने ‘न्यायालयाचा गौरव राखा’ हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत न्यायालयांचे वैभव आणि न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा अबाधित राखण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन विभागाचे उपाध्यक्ष राघवन सारथी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
सारथी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या दरम्यान झालेल्या जाहीर वादामुळे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा मलीन होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारचा वाद पुन्हा होऊ नये, याची काळजी घेण्याचा उद्देशही उपक्रमातून पूर्ण केला जाईल. त्यासाठी केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय आणि तत्सम यंत्रणांमधील व्यक्तींचा समावेश असलेली एक समिती तयार करण्याची काँग्रेसची मागणी आहे. ही समिती सर्वोच्च न्यायालयासह उच्च न्यायालय आणि तत्सम यंत्रणांवर नजर ठेवून अंकुश ठेवण्याचे काम करेल.

Web Title: 'Courage of the Court!' Congress campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.