लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय न्यायव्यवस्थेचे महत्व अधोरेखित करताना संवैधानिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधी विभागाने ‘न्यायालयाचा गौरव राखा’ हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत न्यायालयांचे वैभव आणि न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा अबाधित राखण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन विभागाचे उपाध्यक्ष राघवन सारथी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.सारथी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या दरम्यान झालेल्या जाहीर वादामुळे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा मलीन होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारचा वाद पुन्हा होऊ नये, याची काळजी घेण्याचा उद्देशही उपक्रमातून पूर्ण केला जाईल. त्यासाठी केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय आणि तत्सम यंत्रणांमधील व्यक्तींचा समावेश असलेली एक समिती तयार करण्याची काँग्रेसची मागणी आहे. ही समिती सर्वोच्च न्यायालयासह उच्च न्यायालय आणि तत्सम यंत्रणांवर नजर ठेवून अंकुश ठेवण्याचे काम करेल.
‘न्यायालयाचा गौरव राखा!’ काँग्रेसचे अभियान
By admin | Published: May 10, 2017 2:42 AM