ड्रग्जप्रकरणी नागपूरमधून कुरियर कंपनीच्या मालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:06 AM2021-05-08T04:06:46+5:302021-05-08T04:06:46+5:30
एनसीबीची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) नागपूरमधून कुरियर कंपनीचा मालक नचिकेत बोरकरला ...
एनसीबीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) नागपूरमधून कुरियर कंपनीचा मालक नचिकेत बोरकरला शुक्रवारी अटक केली.
एनसीबीने ५ मे रोजी वसई रोड रेल्वे स्थानक येथे कारवाई करत ड्रग्ज तस्कर अब्दुल वाहिद (६२) याला ७० ग्रॅम हेरॉईनसह अटक केली आहे. वाहिद हा मथुरा येथून पनवेलला निझामुद्दीन ट्रेनने जात असताना ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर अंधेरी येथे छापा टाकून २ किलो स्यूडो-एफेफेड्रिन जप्त करण्यात आले. ते नऊ ठिकाणी लपवून ठेवण्यात आले होते. यातील एक पार्सल नागपूरमध्ये बूक करण्यात आले हाेते, ते ऑस्ट्रेलिया येथे पाठविण्यात येणार होते.
या माहितीवरून एनसीबीच्या पथकाने नागपूरला शोध सुरू केला. तपासाअंती बोरकरचे कनेक्शन उघड होताच त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
..............................