वाझेला खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:07+5:302021-09-10T04:11:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विशेष न्यायालयाने गुरुवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबईतील खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी ...

Court allows Waze to be treated at a private hospital | वाझेला खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाची परवानगी

वाझेला खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाची परवानगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विशेष न्यायालयाने गुरुवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबईतील खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी करण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याला आता भिवंडी रुग्णालयातून हलविण्यात येणार आहे.

बायपास सर्जरीसाठी भिवंडी रुग्णालयातून मुंबईतील रुग्णालयात हलविण्याची परवानगी मिळावी, यासाठी वाझे याने मंगळवारी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

या अर्जाला एनआयएने विरोध केला नाही; परंतु वाझे याच्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्तात उपचार करण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती एनआयएने न्यायालयाला केली.

आरोपी योग्य ते उपचार घेऊ शकतो आणि मुंबईतील खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी करू शकतो, असे एनआयएने म्हटले.

दरम्यान, वाझे याने आपल्याबरोबर आपल्या पत्नीला राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली. आपली काळजी घेण्यासाठी आणि उपचारासंबंधी आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी पत्नीला आपल्याबरोबर राहू द्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली.

न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून वाझे याचा अर्ज मान्य केला.

Web Title: Court allows Waze to be treated at a private hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.